नवी दिल्ली : मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ नोंदवली गेली. जागतिक बाजारपेठेतील जोरदार कलच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 337 रुपयांनी वाढून 46,372 रुपये झाला. पूर्वीच्या सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 46,035 रुपयांवर बंद झाला होता.
आज चांदीचा भावही वाढला आणि मौल्यवान धातू 1,149 रुपयांनी वाढून 69,667 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारी सत्रात चांदी 68,518 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 337 रुपये वाढीसह व्यापार करत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोन्यात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1808 डॉलर तर चांदी 28.08 डॉलर प्रति औंसवर होता.
दरम्यान, मंगळवारी सोन्या-चांदीच्या फ्युचर्सच्या किमतींमध्ये वाढ नोंदली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एप्रिल 2021 मध्ये सकाळी 10:20 वाजता डिलिव्हरी सोन्याचे भाव 47 रुपयांनी म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वधारले आणि दर 10 ग्रॅमसाठी 46,948 रुपये झाला. त्याचप्रमाणे जून २०२१ मध्ये, डिलीव्हरी सोन्याची किंमत 41 रुपयांच्या वाढीसह म्हणजेच 0.09 टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम 47,063 रुपये होती. मागील सत्रात एप्रिल 2021 मध्ये सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 46,901 रुपये होती
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मार्च २०२१ मध्ये चांदीचा दर सकाळी १०:२१ वाजता 232 रुपये म्हणजेच 0.33 टक्क्यांनी वाढून 70,664 रुपये प्रति किलोवर होता. ब्लूमबर्गच्या मते, एप्रिल 2021 रोजी कॉमेक्सवरील कॉन्ट्रॅक्ट सोन्याचे भाव 3 डॉलर म्हणजे 0.17 टक्क्यांनी वधारून 1,811.40 डॉलर प्रति औंस होते.
महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात 490 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 46,950 रुपये झाला. गेल्या सत्रात हा दर 46,460रुपये इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 45,950 रुपये प्रति झाला आहे. गेल्या सत्रात हा दर 45,460 रुपये इतका होता. तर यासोबतच चांदीच्या भावात 1300 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. त्यामुळे 69,200 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 70,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.
शहर | आजचा दर | कालचा दर |
मुंबई | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
पुणे | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
जळगाव | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
कोल्हापूर | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
लातूर | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
सांगली | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
बारामती | ४६ हजार ९५० | ४६ हजार ४६० |
शहर | आजचा दर | कालचा दर |
मुंबई | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
पुणे | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
जळगाव | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
कोल्हापूर | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
लातूर | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
सांगली | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
बारामती | ४५ हजार ९५० | ४५ हजार ४६० |
शहर | आजचा दर | कालचा दर |
मुंबई | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |
पुणे | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |
जळगाव | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |
कोल्हापूर | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |
लातूर | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |
सांगली | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |
बारामती | ७० हजार ५०० | ६९ हजार २०० |