Gold Rate: सोन्याच्या दरात तेजीमुळे गुंतवणूकदारांची चांदी

काम-धंदा
Updated Sep 10, 2019 | 19:53 IST

Gold Rate Today: सोनं आणि चांदीच्या दरात सलग वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सोनं महागलं आहे. जाणून घेऊयात आज सोनं-चांदीचा दर काय आहे.

Gold Rate
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी
  • पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ
  • सोनं स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना झटका

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात वाढ होत आहे. नागरिक सोनं स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत मात्र, सोन्याच्या दरात वाढच होताना दिसत आहे. अनेक नागरिक हे सोनं महाग झाल्याने खरेदी टाळत आहेत पण अद्याप तरी सोन्याच्या दरात घसरण होत नसल्याचं दिसत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात २४ टक्क्यांनी तर चांदी २१ टक्क्यांनी महागली आहे. या असामान्य तेजीच्या मागील कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेलं व्यापार युद्ध असल्याचं बोललं जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचं सावटही एक कारण आहे. 

राजस्थानमधील जयपूर येथील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा दर ३९५४० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला. तर चांदीचा दर ४८४८० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. एका प्रमुख वेबसाइटनुसार, एका महिन्यापूर्वी हाच दर क्रमश: ३८४६० रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदीचा दर ४४,३८० रुपये प्रति किलो इतका होता. म्हणजेच क्रमश: या दोन्हीच्या दरात २.८% आणि ९.२४% इतकी तेजी आली आहे. 

एका वर्षापूर्वी सोनं-चांदीच्या दरांची तुलना केली तर हा भाव २४.०६ टक्के आणि २१.२० टक्क्यांनी वाढ झआली आहे. गेल्यावर्षी १० सप्टेंबर रोजी जयपूर येथील सराफा बाजारात ९९.९९ सोन्याचा दर ३१,८७१.७० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता तर चांदीचा दर ४०,००० रुपये प्रति किलो इतका होता.

व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या आठव्यात सराफा बाजारात ग्राहकांनी भलेही पाठ फिरवली असेल मात्र, वार्षिक आणि मासिक आधारावर एकूणच तेजी पहायला मिळत आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी अमेरिका आणि चीन या दोन देशांत सुरू असलेलं व्यापार युद्ध, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आणि एकूणच आंतरराष्ट्रीय परिस्थिती या सर्वांचा परिणाम सोनं-चांदीच्या दरावर होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...