Gold Price Today : सोन्याचे किरकोळ दर आले खाली, चांदीतही लक्षणीय घसरण, जाणून घ्या संध्याकाळचे भाव 

 Today Retail Gold and Silver Rate| आजचे सोने चांदी दर । सोमवारी घरगुती सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूच्या किंमती घसरल्या.

gold price today the spot price of gold fell significant fall in silver price know how cheap these- precious metals have become
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  सोमवारी घरगुती सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूच्या किंमती घसरल्या.
  • सोन्यासह चांदीची देशांतर्गत किंमतही सोमवारी घसरली.
  • सोमवारी संध्याकाळी कॉमेक्सवरील सोन्याचे जागतिक वायदाचे दर 0.17 टक्क्यांनी म्हणजे 3.20 डॉलर खाली  घसरून1888.80 डॉलर प्रति औंस झाले.

नवी दिल्ली :  सोमवारी घरगुती सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूच्या किंमती घसरल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या स्पॉट किंमतीत प्रति 10 ग्रॅम 152 रुपयांची घट झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,107 रुपयांवर आली आहे. सिक्युरिटीजनुसार कमकुवत जागतिक कलमुळे देशांतर्गत पातळीवर ही घसरण नोंदली गेली. मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,259 रुपयांवर बंद झाले होते.

सोन्यासह चांदीची देशांतर्गत किंमतही सोमवारी घसरली. चांदीच्या दरात घसरण 540 रुपये प्रतिकिलो झाली आहे. या घसरणीमुळे चांदीचा दर प्रति किलो 69,925 रुपयांवर आला आहे. मागील सत्रात चांदीची किंमत 70,465 रुपये प्रतिकिलो होती.

जगातील स्तरावर  सोन्याचा भाव 

ब्लूमबर्गच्या मते, सोमवारी संध्याकाळी कॉमेक्सवरील सोन्याचे जागतिक वायदाचे दर 0.17 टक्क्यांनी म्हणजे 3.20 डॉलर खाली  घसरून1888.80 डॉलर प्रति औंस झाले. त्याच वेळी सोन्याची देशांतर्गत किंमत 0.21 टक्क्यांनी म्हणजे 3.95 डॉलर खाली आली असून ते  1887.64 डॉलर प्रति औंसवर होता.

जागतिक चांदी किंमत

ब्लूमबर्गच्या मते, सोमवारी संध्याकाळी कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक बाजारभाव 0.65 टक्क्यांनी म्हणजे 0.18 डॉलर खाली घसरून 27.72 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. त्याचबरोबर चांदीची जागतिक पातळीवरील किंमत 0.51 टक्के म्हणजे 0.14 डॉलर प्रति औंसच्या तेजीसह व्यापार झाला.

एमसीएक्सवर सोनं

देशांतर्गत वायदा बाजाराबद्दल बोलताना सोमवारी संध्याकाळी एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट 2021 रोजी सोन्याचे वायदा 0.18 टक्क्यांनी किंवा 89 रुपयांनी घसरून ते प्रति 10 ग्रॅम 48,905 रुपयांवर व्यापार झाला.

एमसीएक्सवर चांदी

सोमवारी 5 जुलै 2021 रोजी एमसीएक्स एक्सचेंजमधील चांदीचा वायदा 0.54 टक्क्यांनी किंवा 384 रुपयांनी घसरून 71155 रुपये प्रतिकिलो राहिला.

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोन्याच्या भावात  घट झाली.  सोन्याचे भावात 800 रुपयांची घट झाली.  राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 48,510 रुपये झाला आहे. काल सोन्याचा दर 49,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 47,510 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. काल हा दर  48,310  रुपये प्रति 10 ग्रॅम  होता.   यासोबतच चांदीच्या भावात 600 रुपये प्रति किलोग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे काल 71600 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 71000 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०
पुणे  ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०
जळगाव  ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०
कोल्हापूर ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०
लातूर ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०
सांगली ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०
बारामती  ४८ हजार ५१० ४९ हजार ३१०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०
पुणे  ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०
जळगाव  ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०
कोल्हापूर ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०
लातूर ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०
सांगली ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०
बारामती  ४७ हजार ५१० ४८ हजार ३१०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ७१ हजार ००० ७१ हजार ६००
पुणे  ७१ हजार ००० ७१ हजार ६००
जळगाव  ७१ हजार ००० ७१ हजार ६००
कोल्हापूर ७१ हजार ००० ७१ हजार ६००
लातूर ७१ हजार ००० ७१ हजार ६००
सांगली ७१ हजार ००० ७१ हजार ६००
बारामती  ७१ हजार ००० ७१ हजार ६००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी