Gold Price Today: जाणून घ्या आजचा सोनं-चांदीचा दर

काम-धंदा
Updated Oct 10, 2019 | 23:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Gold Price: दसरा झाला असून आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीसाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज होऊ लागल्या आहेत. त्याच प्रमाणे दिवाळीत सोनं खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल असतो. जाणून घ्या सोन्याचा आजचा दर.

gold price today thursday 10 october indian sarafa bazar mumbai delhi silver
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होतेय वाढ 
  • दिवाळीपूर्वी सोनं चाळीशी पार जाणार?
  • जाणून घ्या सोनं-चांदीचा आजचा दर

नवी दिल्ली: गुरुवारी सोन्याच्या दरात जास्त बदल झालेले नाहीत. मागणी कमी झाल्यामुळे दिल्लीतील साराफा बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या आकड्यांनुसार सोन्याच्या दरात तीन रुपयांनी किंचीत वाढ झाली आहे. गुरुवारी सोन्याचा दर ३९,३७५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. बुधवारी हा दर ३९,३७२ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता.

तर चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीचा दर किरकोळ घसरणीमुळे ४७,१२० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. बुधवारी चांदीचा दर ४७,१४४ रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीन यांच्यातील दोन दिवसीय व्यापार चर्चेला आज सुरुवात झाली. आता पुढील दोन दिवस या चर्चेसंदर्भात एखादी टिप्पणी किंवा ट्विटवर बाजाराचं लक्ष लागलेलं आहे.

आर्थिक विकास दर आणि व्यापाराच्या संदर्भातील चर्चा यावरुन गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती मजबूत स्थितीत असल्याचंही तपन पटेल यांनी म्हटलं आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत स्थिती असतानाही गुरुवारी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात फ्युचर मार्केटमध्ये १७४ रुपयांनी घसरण होत ४५,८७० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये चांदी ०.०६ टक्क्यांनी मजबूत होऊन १७.८२ डॉलर औंसवर पोहोचली.

गेल्या काही महिन्यांपासून सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याचा दर तब्बल ४०,००० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती जैसे थे राहिली आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकूवत झाला तर सोन्याचा दर ४० हजार रुपयांचा टप्पाही ओलांडेल असं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी