लग्नसराईमुळे सोन्याच्या दरात झाले मोठे बदल, जाणून घ्या काय आहे रेट

Gold Price Today: लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. जागतिक बाजारात सोन्यात तेजी आपल्याने स्थानिक बाजारातही वाढ झाली.  जाणून घ्या सराफा बाजाराचा ताजा रेट 

gold price today up by rs 400 silver by rs 737 on 30 january 2020 in delhi mumbai sarafa business news in marathi tbis
लग्नसराईमुळे सोन्याच्या दरात झाले मोठे बदल, जाणून घ्या काय आहे रेट   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  देशात सध्या सुरू झालेल्या लग्नसराईमुळे सोने आणि चांदीचे दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचा भावात ४०० रुपयांची वाढ दिसून आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ४१ हजार ५२४ झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्याचा भाव ४१ हजार १२४ होता. 

दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. चांदीचा दर ७३७ रुपयांनी वाढून प्रति किलो ४७ हजार ३९२ रुपये पोहचला आहे. गेल्या कारोबारी सत्रात ४६ हजार ५५५ रुपयांवर चांदी बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, वैश्विक बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ आणि देशात लग्नाचा सीझन सुरू झाल्याने राजधानी दिल्ली २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव ४०० रुपयांनी वाढला. लग्नाच्या सीझनमुळे आगामी महिन्यात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून येणार आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३९,८०० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ३९,२५०  रुपये प्रति १० ग्राम

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ४०,८०० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ४०,२५० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ४९,८१० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ४९,२०० रुपये प्रति १ किलो

दरम्यान, गुरूवारी रुपया कमजोरीने उघडला. सुरूवातीच्या कारभारात रुपया डॉलरच्या तुलने १९ पैशांनी तुटून ७१.४७ च्या स्तरावर पोहचला होता. आंतरराष्टीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. 

सोन्याचा हा भाव या ठिकणी १५८२ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १७.७२ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहचला. वायदा कारभारात सोने २२४ रुपये वाढून ४० हजार ५७४ रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये फेब्रुवारी डिलीव्हरीच्या सोन्याचा दर २२४ रुपये म्हणजे ०.५६ टक्क्यांनी वाढून ४० हजार ५७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी