Gold-Silver Rate Today, 26 August 2022: सोने थबकले! सगळ्यांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन चेअर पॉवेलच्या भाषणावर, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 26 August 2022: सोन्याच्या भावात (Gold Price)मोठे चढउतार झालेले दिसत नाहीत. सोने सध्या थबकल्यासारखे झाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. जॅक्सन होल इव्हेंटमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल (US Fed Chair Jerome Powell ) यांचे भाषण होणार आहे. त्याचा दबाव सोन्याच्या भावावर आहे. परिणामी भाषणापूर्वी शुक्रवारी भारतात सोन्याचे भाव खाली आले.

Gold and Silver Rate Today:  Gold prices remains flat
Gold and Silver Rate Today: सोन्याचा भाव दबावाखाली 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावावर दबाव
  • एकीकडे डॉलर तर दुसरीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह
  • अमेरिकेत व्याजदर वाढीची शक्यता

Gold and Silver Rate Today, 26 August 2022:नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price)मोठे चढउतार झालेले दिसत नाहीत. सोने सध्या थबकल्यासारखे झाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. जॅक्सन होल इव्हेंटमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल (US Fed Chair Jerome Powell ) यांचे भाषण होणार आहे. त्याचा दबाव सोन्याच्या भावावर आहे. परिणामी भाषणापूर्वी शुक्रवारी भारतात सोन्याचे भाव खाली आले. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX), सोने ऑक्टोबर फ्युचर्स 59 रुपये किंवा 0.11 टक्क्यांनी 
घसरून 51,643 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आले होते. हेच आधी 51,702 रुपयांच्या पातळीवर होते. तर चांदीचा सप्टेंबर फ्युचर्स 74 रुपये किंवा 0.13 टक्क्यांनी वाढून 55,463 रुपये प्रति किलो झाला. गुंतवणुकदारांनी सोन्याच्या व्यवहाराबाबत सावध भूमिका घेतली आहे. (Gold price under pressure amid speech of US Fed Chair Jerome Powell)

अधिक वाचा : Heart Attack : खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

सोन्याच्या भावाचा ट्रेंड

जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव घसरला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेच्या शक्यतेमुळे गुंतवणुकदारांनी सावध धोरण स्वीकारले आहे. यूएस फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत भाषणापूर्वी बाजाराने सावध पवित्रा स्वीकारला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीसंदर्भात काय जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान स्पॉट गोल्ड 0.2% घसरून 1,755.09 डॉलरप्रति औंस झाले. तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1% घसरून 1,769.2 डॉलरवर आले.

जागतिक बाजारात येथे सोन्याचा भाव शुक्रवारी घसरला. सकाळच्या सत्रात सोने प्रति औंस 1756 डॉलरच्या जवळपास व्यवहार करत होते. तर दुसरीकडे डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या उच्चांकावर असल्याने सोन्याच्या भावावर मोठा दबाव आहे. 

अधिक वाचा : Optical Illusion IQ Test: टिकटॉक स्टारनं अनेकांना खाजवायला लावलं डोकं; फक्त 1% लोक 30 सेकंदात शोधू शकतात तिसरा प्राणी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांच्या मिश्र टिप्पण्या दर्शवितात की मध्यवर्ती बँक पुढील हालचाली निश्चित करण्यासाठी आर्थिक वाढ आणि महागाईवर चर्चा करत आहे. महागाई अजूनही नियंत्रणाबाहेर असल्याने, दर वाढ चालू राहण्याची शक्यता आहे. वाढीच्या चिंतेमुळे आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँका अधिक कडक आर्थिक धोरण सुरू ठेवू शकतील या अपेक्षेमुळे जोखीम भावना निर्माण झाली आहे. जोखीम टाळण्यामुळे बाजारातील गुंतवणुकदार इक्विटी आणि कमोडिटीजसारख्या जोखमीच्या मालमत्तेपासून अमेरिकन डॉलरसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळताना दिसत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

अधिक वाचा : Ancient Statues : दुष्काळामुळे झालं बुद्धदर्शन! नदीखाली सापडल्या सहा शतकांपूर्वीच्या बुद्धांच्या मूर्ती

डॉलरशी सोन्याचे नाते

डॉलर अलीकडील उच्चांकावरून घसरल्याने सोन्याच्या भावात तेजी आली होती. त्याचबरोबर गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणावरील संकेतांसाठी जॅक्सन होल सिम्पोजियममधील घोषणेची वाट पाहताना दिसत आहेत.अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या धोरणाविषयीचे संकेत जेरॉम पॉवेल यांच्या भाषणातून मिळणार आहेत. मागील काही दिवसात अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यापुढील काळातदेखील अमेरिकन फेड महागाईला निंयत्रणात ठेवण्यासाठी हीच भूमिका पुढे नेण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी