वाढल्या सोन्याच्या किंमती, चांदीही थोडी चमकली, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव 

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत सुधार झाला आहे. शुक्रवारी सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा तेजी दिसून आली. शुक्रवारी सोन्याचा दरात ११२ रुपयांची वाढ दिसू आली आहे. 

gold price Up by rs 122 silver by rs 94 on 7 february 2020 in delhi mumbai business news in marathi
वाढल्या सोन्याच्या किंमती, चांदीही थोडी चमकली, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत आली वाढ आणि रुपयांच्या मूल्यात झालेली घट यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा पर्याय निवडला. त्यामुळे सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ११२ रुपयांची वाढ दिसून आली. 

सोने झाले महाग 

आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्याच्या दरात ११२ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचे १० ग्रॅमसाठी दर ४१ हजार २४९ रुपये झाले आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावाबद्दल बोलायचे तर शुक्रवारी ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याची किंमत  १० ग्रॅमसाठी दर ४१ हजार २४९ रुपये झाली आहे. यापूर्वी गुरूवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. ते ४० हजार ८६९ वरून ४१ हजार ०१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते. 

चांदीची किंमत

सोन्यासह चांदीच्या किंमतीतही सुधारणा झाली आहे. चांदीचा भाव ९४ रुपयांनी वाढला आहे.  एक किलो चांदीचा दर ४७ हजार ३०५ रुपयांपर्यंत पोहचला आहे. इंडस्ट्रियल मागणी वाढल्यामुळे दिल्लीत चांदीच्या किंमतीत ९४ रुपायंनी वाढ झाली. गुरूवारी चांदीचा दर प्रति किलो ४७ हजार २११ रुपये होता. सिक्का लिवाली आणि बिकवाली गेल्या दिवशी क्रमशः ९७० आणि ९८० रुपये दर होता. 

का झाले सोने महाग 

बाजारातील जाणकारांच्या मते डॉलरच्या तुलने रुपयांच्या मूल्यात आलेली घट यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष हे सोन्याने आकर्षित केले. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सुधार झाला. शुक्रवारी भारतीय रुपया ड़ॉलरच्या तुलनेत १५ पैसे कमकुवत झाला. शुक्रवारी कारभारात रुपया ९ पैशांनी कमजोर झाला. ७१.२७ वर ट्रेंड करत होता. 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी