नवी दिल्ली : दिल्ली सराफा बाजारात मंगळवारला सुस्त कारभार राहिला. सोन्यात केवळ पाच रुपयांची किरकोळ वाढ दिसून आली. सोन्याचा दर ३९ हजार १०५ रुपये दहा ग्रॅमसाठी झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याच्या खरेदीचा कल कमी होता. पण रुपयात झालेली कमजोरी पिवळ्या धातू घट दिसून आली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, २४ कॅरेट सोन्याचा हाजिर भाव पाच रुपयांच्या तेजी सह दहा ग्रॅमसाठी ३९१०५ रुपये झाला. रुपयाच्या मूल्यात झालेल्या घटीनंतर स्थानिक बाजारात सोन्याची खरेदी लोकांनी सांभाळून केली. दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय दर १० पैसे कमी सुरू होता.
गेल्या कारोबारी सत्रात सोन्याचा ३९१०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. दरम्यान चांदीच्या दरात ९१ रुपये घट दिसून आली. प्रति किलोसाठी ४६८०६ रुपये चांदीचा दर खाली आहे. सोमवारी भाव ४६ हजार ९०० रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजीसह दर १४९३.३० डॉलर प्रति औंस होता. तर चांदीत वाढी सोबत १७.६२ डॉलर प्रति औंस वर होता.
मल्टी कमोडीटी एक्सचेंजवर डिसेंबर महिन्याच्या डिलेव्हरीचे सोने ५१ रुपये म्हणजे ०.१३ टक्के खाली येऊन ३८,१७५ प्रती दहा ग्रॅमवर आला. यात १७२३ लॉट व्यापार झाला. या प्रकारे फेब्रुवारीच्या डिलेव्हरीच्या सोने २३ रुपये म्हणजे ०.०६ टक्के खाली येऊन ३८,४८० रुपये प्रति दहा ग्रॅमवर खाली आले.