सोन्या चांदीच्या भावात झाला बदल, जाणून घ्या आज काय आहे भाव 

काम-धंदा
Updated Nov 07, 2019 | 20:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Rate: सोने चांदीच्या दरात गुरूवारी बदल झालेत. बुधवारी सोन्याचा भावात घट आली होती. जाणून घ्या गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने आणि चांदीची किंमत काय आहे. 

gold price up by rs 70 per 10 gram silver by rs 230 on 7 november business news in marathi google newsstand
सोन्या चांदीच्या भावात झाला बदल, जाणून घ्या आज काय आहे भाव   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सलग दोन दिवस झाली होती सोन्या चांदीच्या दरात घट
  • तिसऱ्या दिवशी रुपया कमजोर पडल्याने झाली सोन्याच्या दरात वाढ
  • अमेरिका-चीन करार लांबणीवर पडल्यानेही झाला परिणाम

नवी दिल्ली :  अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत पडल्याने गुरूवारी सोन्याच्या दरात ७० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price Today) ३८ हजार ९३० रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे.  बुधवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ३८ हजार ८६० रुपयांवर बंद झाला होता. 

 सोन्यात जशी तेजी आली तशी तेजी चांदीतही दिसून आली. चांदीचा दर प्रति किलो मागे २३० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे हा दर प्रतिकिलोला ४६ हजार ५१० रुपये झाला. बुधवारी हा दर ४६ हजार २८० रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की रुपयाच्या विनिमय दरात घट झाल्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७० रुपयांनी वाढला. 
 
 अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर हस्ताक्षरांवर डिसेंबरपर्यंत उशीर होत असल्याने गुंतवणूकदारांची धारणा प्रभावित होत आहे. त्यामुळे गुरूवारी सुरवाती ट्रेंडींगमध्ये रुपयांच्या दरात १४ पैशांची घट झाली. त्यामुळे डॉलरचे मूल्य ७१.११ डॉलर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली १४८७ डॉलर प्रति औंस तर चांदी १७.५४ डॉलर प्रति औंस हा दर होता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी