लग्न सराई येताच वाढली मागणी, जाणून घ्या काय आहे सोन्या चांदीचा भाव 

काम-धंदा
Updated Nov 04, 2019 | 20:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Price: लग्नसराई येताच सोने आणि चांदीची मागणी वाढते. सोमवारी सराफा बाजारात याचा परिणाम दिसला. जाणून घ्या काय आहे सोने चांदीचे दर... 

gold price up by rs 78 per 10 gram silver by rs 245 on 4 november political news in marathi google batmya
लग्न सराई येताच वाढली मागणी, जाणून घ्या काय आहे सोन्या चांदीचा भाव   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  लग्नसराईमुळे वाढलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत ७८ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३९ हजार २६३ रुपये प्रती १० ग्रॅम झाला आहे. बाजारातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, भारतात लग्न समारंभाच्या सिझनमुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८ रुपयांची वरची बोली बोलली गेली. 

शनिवारी सोन्याचा भाव ३९,१८५ प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. सोमवारीच्या कारभारात चांदीही २४५ रुपयांच्या तेजीने ४७७३५ रुपये प्रति किलोग्रॅमवर वर गेली. गेल्या सत्रात हा दर ४७,४९० रुपये प्रति किलोग्रॅम होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात नरमी होती. सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव १५०९ डॉलर प्रति औंस तर चांदी १८.०८ डॉलर प्रति औंस होता. बाजाराची पुढील दिशेसाठी अमेरिका आणि चीनच्या व्यापार कराराच्या घटनाक्रमावर सर्वजण वाट पाहत आहे. 

एमसीएक्समध्ये सोन्याची डिसेंबर महिन्याची डिलेव्हरीच्या कराराची किंमत ९१ रुपये आणि ०.२४ टक्क्यांची वाढीसह ३८,४०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. यात १६,२३२ लॉटचा व्यापार झाला. बाजार विश्लेशकांनी सांगितले की, स्थानिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या सौद्याचा आकार वाढला. मुख्यतः वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...