सोने पुन्हा झाले स्वस्त, चांदीच्या किंमतीतही झाली घट, जाणून घ्या आपल्या बाजारातील 10 ग्रॅम सोन्याची किंमत

काम-धंदा
Updated Apr 11, 2021 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोन्याच्या किंमती सतत वरखाली होतच असतात. सोने आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून घसरत घसरत खूपच स्वस्त झाले आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आपल्या उच्च स्तरावरून 10 हजार रुपयांनी खाली आली आहे.

Gold jewelry
सोने पुन्हा झाले स्वस्त, चांदीच्या किंमतीतही झाली घट, जाणून घ्या आपल्या बाजारातील 10 ग्रॅम सोन्याची किंमत 

थोडं पण कामाचं

  • 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजारांच्या वर
  • जाणून घ्या राजधानीत किती आहे सोन्याची किंमत
  • जाणून घ्या कुठे सर्वात स्वस्त आहे सोने

नवी दिल्ली - सोने (Gold) आणि चांदीच्या (silver) किंमतीत (rates) सातत्याने उतारचढाव (changes) होतच असतात. मात्र सोने आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून (all time high) घसरत घसरत खूपच स्वस्त (cheap) झाले आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आपल्या उच्च स्तरावरून 10 हजार रुपयांनी खाली आली आहे. देशात कोरोनाच्या संकटादरम्यान (corona pandemic) सुरू असलेल्या लग्नांसोबतच (marriages) सोने आणि चांदीच्या किंमतीतही वाढ (hike) झाली आहे. मात्र ही वाढ फारच किरकोळ (negligible) आहे. ऑगस्ट 2020मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार रुपयांवर पोहोचली होती. मात्र आता हीच किंमत 46 हजार रुपयांवर आली आहे.

24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजारांच्या वर

गेल्या कारभारी सत्रात म्हणजेच शुक्रवारी बाजार उघडताना 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,554 होती, जी बाजार बंद होताना साधारण 100 रुपयांनी कमी होऊन 46,446वर पोहोचली. तर 1 किलो चांदीची किंमत बाजार उघडताना 67,175 होती जी बाजार बंद होताना 66,930 रुपयांवर आली होती. इंडियन बुलियान अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार गुरुवारी बाजार उघडताना 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,152 होती जी बंद होताना किरकोळ वाढून 46,411वर गेली. आबीजेएच्या किंमती देशभरात मानल्या जातात. मात्र या किंमतीत जीएसटी समाविष्ट केलेला नसतो.

जाणून घ्या राजधानीत किती आहे सोन्याची किंमत

रुपयाच्या किंमतीत घट झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात गेल्या कारभारी सत्रात सोने 97 रुपयांनी मजबूत होऊन 46,257 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले. एचडीएफसी सिक्युरिटीजनी ही माहिती दिली आहे. गेल्या कारभारी सत्रात सोने 46,160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. याउलट चांदीचा भाव 275 रुपयांनी कमी होऊन 66,253 रुपये प्रति किलो झाली.

जाणून घ्या कुठे सर्वात स्वस्त आहे सोने

गुड रिटर्न्सच्या संकेतस्थळानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि पटणा या शहरांमध्ये सोन्याची किंमत सर्वात कमी आहे. इथे 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,700 रुपये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी