Gold and Silver Rate Today, 10 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price)आज घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलर (Dollar) मजबूत झाल्याचा फटका सोन्याच्या भावाला बसला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील बहुप्रतिक्षित महागाईच्या आकडेवारीपूर्वीदेखील सराफा बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) घसरण झाली आहे. सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावावर सध्या अमेरिकेतील आकडेवारीचा दबाव आहे. वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US fed) जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 75 बेसिस पॉइंटने व्याजदर वाढवले होते. सोन्याला महागाईविरूद्ध बचावाचे साधन म्हणून पाहिले जात असले तरी, अमेरिकेतील वाढलेले व्याजदर सोन्याचे आकर्षण कमी करतात, परिणामी सोन्याच्या भावावर परिणाम होतो. (Gold prices drops amid strong dollar and US CPI data)
अधिक वाचा : Pune Crime News: पुणे हादरलं, भरदिवसा अपहरण करून 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.24 टक्क्यांनी किंवा 124 रुपयांनी कमी होऊन 52,365 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. चांदीचा भाव मात्र 0.25 टक्क्यांनी घसरून 58,650 रुपये प्रतिकिलो झाला. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 52,184 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावावर आहे. तर चांदीचा भाव 58,106 रुपये प्रति किलो इतकी होती. सोन्याच्या स्पॉट किंमती गेल्या दोन आठवड्यात सुमारे 1,300 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढल्या आहेत. तर याच कालावधीत चांदी प्रति किलो 3,400 रुपयांपेक्षा जास्त वाढली आहे.
अधिक वाचा : Viral Video : हत्तीच्या कळपासोबत घेत होता सेल्फी, हत्तींना दाखवला हिसका
अॅक्सिस सिक्युरिटीजचे कमोडिटीज प्रमुख प्रीतम पटनायक म्हणतात, सोने व्यापारी थोडे सावध आहेत कारण ते अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत. कारण महागाईचा सामना करण्यासाठी अमेरिकन फेडच्या धोरणात्मक बाबींसाठी हा मार्गदर्शक घटक असेल. "डॉलर इंडेक्स आणि बाँडचे उत्पन्न दोन्ही स्थिर राहिल्याने, सोन्याच्या भावाला नजीकच्या काळात काही अडचणींचा सामना करावा लागेल," असे ते पुढे म्हणाले.
अमेरिकेतील रोजगारासंदर्भात मागील आठवड्यात सकारात्मक ठोस अहवाल आल्यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve)आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता वाढवली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचे भाव स्थिर झाले तर डॉलरचे मूल्य वाढले आहे आणि अमेरिकन बॉंडचा परतावा वाढला आहे. जुलैमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांच्या वाढीला अनपेक्षितपणे वेग आला. रोजगाराची पातळी त्याच्या कोरोना महामारीच्या आधीच्या पातळीपेक्षा वर आली आणि अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती कमी झाली.
मंगळवारी 5 जुलैनंतरचा उच्चांक 1,800.29 डॉलरवर पोहोचल्यानंतर स्पॉट गोल्डने प्रति औंस 1,793.39 डॉलरवर आपले स्थान राखले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून 1,810 डॉलरवर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी घसरून 20.47 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.4 टक्क्यांनी घसरून 930.14 डॉलर आणि पॅलेडियम 0.1 टक्क्यांनी घसरून 2,217.40 डॉलरवर आले.