Gold-Silver Rate Today, 27 August 2022: सोन्याच्या भावाचे 'कभी खुशी कभी गम' सुरूच...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 27 August 2022: सोन्याच्या भावात (Gold Price)आज पुन्हा घसरण झाली आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 51,670 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 47,330 रुपये आहे. सोन्याच्या भावातील चढउतार सुरूच आहेत. सोन्याच्या भावात मागील काही काळात झालेल्या घसरणीमुळे एकीकडे गुंतवणुकदारांना मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र त्याचबरोबर भविष्यात व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे गुंतवणुकदार सावध पावित्रा घेत आहेत.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव अस्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात आज घसरण झाली
  • जागतिक बाजारात गुंतवणुकदारांचा सावध पावित्रा
  • डॉलर आणि अमेरिकेतील व्याजदर ठरवणार सोन्याची दिशा

Gold and Silver Rate Today, 27 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price)आज पुन्हा घसरण झाली आहे.  भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 51,670 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 47,330 रुपये आहे. सोन्याच्या भावातील चढउतार सुरूच आहेत. सोन्याच्या भावात मागील काही काळात झालेल्या घसरणीमुळे एकीकडे गुंतवणुकदारांना मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र त्याचबरोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Fed) व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणुकदार सावध पावित्रादेखील घेत आहेत. (Gold prices fall amid prospects of rate hike by US fed) 

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोमध्ये लपले आहे फुलपाखरु, ३० सेकंदात दाखवा शोधून

सोन्याच्या भावावर दबाव

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावावर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेच्या शक्यतेमुळे गुंतवणुकदार सराफा बाजारापासून अंतर राखत आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल नेमकी काय घोषणा करतात आणि त्यातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची पुढील गती कशी राहणार या पार्श्वभूमीवर बाजाराने सावध पवित्रा स्वीकारला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीसंदर्भात काय जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

अधिक वाचा : India vs Pakistan Match Preview Asia Cup 2022 : रविवारी आशिया कप स्पर्धेत भिडणार भारत आणि पाकिस्तान

देशाच्या विविध शहरांमधील सोन्याचा भाव

गेल्या 24 तासांत विविध भारतीय शहरांमध्ये सोन्याच्या भावात चढ-उतार झाले आहेत. चेन्नईमध्ये आजचा सोन्याचा भाव 24 कॅरेट (10 ग्रॅम) 51,285 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) 47,927 रुपये आहे. दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 52,140 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) 47,800 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव  51,980 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव  47,650 रुपये आहे. मुंबईत मात्र 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 52,980 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम)  47,650 रुपये आहे. तर भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 51,980 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 47,650 रुपये आहे. गेल्या 24 तासांत 24 कॅरेट (10 ग्रॅम) आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून आली आहे.

अधिक वाचा : सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय,अलविदा अशी चिठ्ठी लिहित तरुणीने केली आत्महत्या

सावध गुंतवणुकदार

अमेरिकन फेड पुढील हालचाली निश्चित करण्यासाठी आर्थिक वाढ आणि महागाईवर चर्चा करत आहे. महागाई अजूनही नियंत्रणाबाहेर असल्याने, व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढीच्या चिंतेमुळे आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँका अधिक कडक आर्थिक धोरण सुरू ठेवू शकतील या अपेक्षेमुळे जोखीम भावना निर्माण झाली आहे. गुंतवणुकदार इक्विटी आणि कमोडिटीजसारख्या जोखमीच्या मालमत्तेपासून अमेरिकन डॉलरसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळत जोखीम कमी करताना दिसत आहेत. आगामी काळात त्यामुळे सोन्याच्या भावातील रस्सीखेच सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

डॉलरच्या मुूल्यातील चढउतारांचादेखील आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावावर परिणाम होतो आहे. डॉलर उच्चांकीवरून खाली आल्यावर मागील काही दिवसात सोन्याच्या भावात तेजी दिसून आली होती. मात्र आता पुन्हा डॉलर सावरताना दिसतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी