Gold-Silver Rate Today, 17 September 2022: अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी सोने घसरले...आता सोने खरेदी करावी का?

Gold and Silver Rate Today, 17 September 2022: सोन्याच्या भावातील अस्थिरता सुरूच आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अमेरिकन फेड व्याजदरात वाढ करण्याची जोरदार शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणुकदार सोन्यातील गुंतवणूक काढून घेत डॉलरकडे मोर्चा वळवत आहेत. सोन्यावरील दबाव आगामी दिवसांमध्येही दिसून येण्याची शक्यता आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • आगामी काळातदेखील सोने अस्थिर राहण्याची आणि दबावाखाली राहण्याचीच चिन्हे
  • सोन्याच्या भावात घसरण सुरूच
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) बैठकीत व्याजदर वाढीची शक्यता

Gold and Silver Rate Today, 17 September 2022: नवी दिल्ली : सोन्याच्या भावावरील (Gold Price) दबाव अजूनही कायम आहे. किंबहुना आगामी काळातदेखील सोने अस्थिर राहण्याची आणि दबावाखाली राहण्याचीच चिन्हे आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. या बैठकीत व्याजदर वाढीची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याच्या भावात घसरणीची शक्यता आहे. अर्थात मागील आठवड्यात मात्र अनपेक्षित आणि निराशाजनक अमेरिकन सीपीआय आकडेवारीनंतर (US Inflation), स्पॉट आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात मोठे चढउतार झाले आणि मोठी विक्री झाली. ऑगस्टमध्ये अमेरिकेतील महागाई 8.1 टक्क्यांच्या अपेक्षेविरुद्ध 8.3 टक्के वार्षिक दराने वाढली. त्यामुळए आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत 100 bps व्याजदर वाढीचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. (Gold prices fall amid prospects of US interest hike)

अधिक वाचा : Nanded Crime News मुलगी देण्यास नकार दिला म्हणून भाच्याने मामाची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या 

सोन्याचा भाव

साप्ताहिक आधारावर, मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव 1,187 रुपये प्रति 10 ग्रॅम (2.35 टक्के) घसरत 50,521 वरून 49,334 रुपयांच्या पातळीवर आला. सोन्याचा भाव देशांतर्गत बाजारातील 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. स्पॉट मार्केटमध्ये, सोन्याच्या भावात शुक्रवारी 1,654 डॉलरची या 2 वर्षांच्या नीचांकी पातळी गाठली पण नंतर सोन्याच्या भावाने काही प्रमाणात दिलासा दिला आणि अखेरीस वीकेंडच्या सत्रात 1,674 डॉलर प्रति औंसवर स्थिरावला. त्यामुळे सोन्याच्या भावात 2.45 टक्क्यांची साप्ताहिक घसरण नोंदवली गेली.

अधिक वाचा : आहारात करा या बियांचा समावेश...मग पाहा जादू, आजार राहतील दूर

जाणकार काय म्हणतात

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात होणार्‍या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपर्यंत सोन्याच्या भावाचा नकारात्मक ट्रेंड राहण्याची अपेक्षा आहे. जाणकारांच्या मते, स्पॉट सोन्याचा भाव सध्या 1,640 डॉलर ते 1,685 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करतो आहे. स्पॉट मार्केटमधील खालच्या पातळीचा भंग केल्यावर, सोन्याला पुढील समर्थन 1,610 डॉलर प्रति औंस स्तरावर आहे तर वरच्या बाजूला, सोन्याच्या भावाला पुढील अडथळा 1,710 डॉलरच्या पातळीवर आहे. त्यामुळे पुढील काळात सोन्याच्या भावात चढउतार दिसू शकतात. एमसीएक्सवर सोन्याच्या भावाला तात्काळ समर्थन 48,800 रुपयांच्या पातळीवर आहे. तर मजबूत समर्थन 48,300 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावावर आहे. 

अधिक वाचा : लोकांना अपेक्षित असणारे निर्णय सरकार घेणार: मुख्यमंत्री 

अमेरिकेतील महागाईचा परिणाम

अमेरिकेतील ऑगस्टमधील निराशाजनक महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर जागतिक स्तरावर सोन्याचा भाव घसरताना दिसतो आहे. बाजाराला अमेरिकेतील महागाई  0.1 टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा होती तर ऑगस्टमधील महागाई 0.1 टक्क्यांनी वाढली. यामुळे पुढील आठवड्यात होणार्‍या यूएस फेडच्या बैठकीत व्याजदरात 100 bps वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार सोन्यातील गुंतवणूक कमी करून अमेरिकन डॉलरकडे वळत आहेत.

ऑगस्टमध्ये अमेरिकेतील महागाई 8.1 टक्क्यांच्या अपेक्षेपेक्षा 8.3 टक्क्यांनी अधिक वाढली.  अर्थशास्त्रज्ञांना उर्जेच्या किंमतींमध्ये मोठी सुधारणा झाल्यामुळे गेल्या महिन्यात महागाईत 0.1 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यातुलनेत महागाईत घट झालेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी