Gold Price Today | लग्नसराईत मोठी संधी! सोने स्वस्त झाले हो...सोने सलग सहाव्या दिवशी घसरले, आठवडाभरात 1,800 रुपयांची घसरण

Gold Rate : लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी मोठी संधी चालून आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मजबूत अमेरिकन डॉलर आणि बॉंड्सचा चांगला परतावा यामुळे जागतिक दर कमी राहिल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या किमती सलग सहाव्या दिवशी दबावाखाली होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात, अमेरिकन डॉलरमध्ये वाढ आणि बॉंड्सच्या परताव्यात झालेली वाढ यामुळे सोने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • मागील आठवडाभरात सोन्याच्या भावात सातत्याने घसरण
  • एमसीएक्सवर सोने 51,874 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीच्या भावात देखील घसरण
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, बॉंड्सचा परतावा, डॉलरचे वाढलेले मूल्य याचा सोन्याच्या भावावर परिणाम

Gold Price Today 25 April 2022 update : नवी दिल्ली : लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी मोठी संधी चालून आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मजबूत अमेरिकन डॉलर आणि बॉंड्सचा चांगला परतावा यामुळे जागतिक दर कमी राहिल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या किमती सलग सहाव्या दिवशी दबावाखाली होत्या. MCX वर, सोन्याचे फ्युचर्स 0.75% घसरून 51,874 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर चांदीचे वायदे 1.3% घसरून 65,745 रुपये प्रति किलो झाले. सहा दिवसांत सोन्याचा भाव आतापर्यंत 1,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका घसरला आहे. (Gold prices fall for consecutive 6th day, big opportuinity to buy)

अधिक वाचा : PM Kisan update | मोठी बातमी! PM किसान योजनेत 8 मोठे बदल, हे काम लवकर करा नाहीतर परत करावे लागतील सर्व हप्ते

अमेरिकन इफेक्ट

आंतरराष्ट्रीय बाजारात, अमेरिकन डॉलरमध्ये वाढ आणि बॉंड्सच्या परताव्यात झालेली वाढ यामुळे सोने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. स्पॉट गोल्ड 0.1% घसरून 1,928.08 डॉलर प्रति औंस होते. हा 7 एप्रिलपासूनचा सर्वात कमी दरआहे. डॉलर निर्देशांक 101.265 वर पोचला, त्यामुळे इतर चलने असलेल्या खरेदीदारांसाठी सोने कमी आकर्षक झाले. इतर मौल्यवान धातूंमध्ये, स्पॉट सिल्व्हर 0.2% घसरून 24.10 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.2% घसरून 928.77 डॉलरवर, आणि पॅलेडियम 2.3% घसरून 2,319.78 डॉलरवर आले.

अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हकडून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी धोरणातील सुधारणा अधिक वेगवान होण्याच्या चिन्हांमुळे  अमेरिकन डॉलर आणि बाँडचे परतावा सोन्यावर भारी पडत आहे, असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे ​​व्हीपी कमोडिटीज राहुल कलंत्री यांनी सांगितले.

अधिक वाचा : LIC IPO | एलआयसीचा नवा प्रस्ताव दाखल, आयपीओच्या नवीन आकाराला मंजूरी, जाणून घ्या लॉचिंगची तारीख, किंमत, गुंतवणुकीविषयीची माहिती

दुसरीकडे, ते म्हणतात, जगात महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आणि रशिया-युक्रेन संकटामुळे अर्थव्यवस्थांचा विकासदर कमी राहण्याच्या चिन्हांमुळे आणि अंदाजांमुळे सोन्याच्या किंमतींना तसा खालच्या बाजूने सपोर्ट आहे. आर्थिक आणि राजकीय संकटांच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक प्रकार किंवा सुरक्षित संपत्ती भांडार म्हणून पाहिले जाते.

चीनमधील परिस्थितीचा परिणाम

यूएस 10 वर्षांचे ट्रेझरी परतावा मात्र अलीकडील उच्चांकी पातळीवर  होते, ज्यामुळे शून्य-उत्पन्न सोन्याचे नुकसान मर्यादित होते. चीनमध्ये गंभीर होत चाललेल्या कोरोना परिस्थितीमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील मागणी कमी झाल्याची चिंता वाढली आहे. चीनचे शून्य कोविड धोरणामुळे गुंतवणुकदार जागतिक पुरवठा साखळी आणि मागणीतील व्यत्ययांमुळे चिंतित आहे. गुंतवणुकदारांनी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाची निवड केल्यामुळे अमेरिकन डॉलरमध्ये वाढ झाली. चीनच्या चिंतेमुळे तेलाच्या किमतींवरही परिणाम झाला आणि ते प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली गेले.

अधिक वाचा : Bank Fraud | फसवणूक झाल्यास 90% पैसे 10 दिवसांत वसूल केले जाऊ शकतात, पाहा कसे परत मिळवायचे तुमचे पैसे

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे लक्ष

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी पुढील महिन्यात 50 बेसिस-पॉइंट वाढीला मान्यता दिल्यानंतर यूएस फेडरल रिझर्व्ह पुढच्या काही महिन्यांत मोठ्या बदलांची अंमलबजावणी करेल अशी ट्रेडर्सना शक्यता वाटते आहे. त्यामुळे याचा सोन्यावर दबाव आहे. युक्रेनचे संकटाचा प्रभाव गुंतवणुकदारांवर आहे, मात्र सोन्याचा भाव हा अमेरिकन फेडरल रिझर्वहचे अल्पकालीन मुदतीचे व्याजदर आणि वाढलेला परतावा यावर जास्त अवलंबून आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी