Gold Rate Today | सोन्याच्या भावावर अमेरिकन घटकांचा दबाव...मात्र मागणीदेखील, त्यामुळे चढउतार...पाहा ताजा भाव

Gold rate : तरराष्ट्रीय घटक, विशेषत: अमेरिकेतील काही घटकांचा सोन्याचा भावावर मोठा परिणाम होतो आहे. अमेरिकन बॉंड्सचा परतावा (US Treasury yields) आणि डॉलरचे मूल्य (dollar)याचा दबाव सोन्याच्या किंमतीवर आहे. मात्र तरीही सोन्याच्या भावात आज थोडी वाढ झाली आहे. त्यातच ध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होत असते. त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी येते.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय घटकांचा घटकांचा सोन्याचा भावावर मोठा परिणाम
  • अमेरिकन बॉंड्सचा परतावा आणि डॉलरचे मूल्य याचा सोन्याच्या किंमतीवर दबाव
  • तर युक्रेनच्या संकटामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराला मागणी

Gold Price Today 22 April 2022 update : नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घटक, विशेषत: अमेरिकेतील काही घटकांचा सोन्याचा भावावर मोठा परिणाम होतो आहे. अमेरिकन बॉंड्सचा परतावा (US Treasury yields) आणि डॉलरचे मूल्य (dollar)याचा दबाव सोन्याच्या किंमतीवर आहे. मात्र तरीही सोन्याच्या भावात आज थोडी वाढ झाली आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी सोन्याचे भाव (Gold Price) 0.16 टक्क्यांनी वाढून 10 ग्रॅमसाठी 52,499 रुपये, तर चांदी (Silver Price)0.08 टक्क्यांनी घसरून 67,074 रुपये प्रति किलोग्रामवर गेली. त्यातच ध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होत असते. त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी येते. (Gold prices fall in international markets due to US Treasury yields & Dollar strength)

अधिक वाचा : IEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार!

भारतातील ताजा भाव

आजच्या घडीला, भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,780 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 49,300 रुपये आहे. काल, 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,620 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 49,150 रुपये होता. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव मागील 24 तासांत जवळपास 150 रुपयांनी वाढला आहे.

अधिक वाचा : PPF withdrawal rules | पीपीएफसंदर्भातील हे 5 नियम तुम्हाला माहित आहेत काय? जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

विविध शहरातील भाव

गेल्या २४ तासांत भारतातील विविध महानगरांमध्ये सोन्याच्या किंमतीत किरकोळ चढउतार दिसून आले. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,960 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,460 रुपये आहे. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,780 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,780 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे.

अधिक वाचा : Air India flight delay | एका उंदराने घातला धुमाकूळ, श्रीनगर-जम्मू एअर इंडियाच्या विमानाला एक तासापेक्षा जास्त उशीर...

आंतरराष्ट्रीय घटकांमुळे चढउतार

अमेरिकन ट्रेझरीचा परतावा आणि डॉलरच्या मजबूतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. तर स्पॉट गोल्ड 0.1% कमी होऊन 1,949.33 डॉलर प्रति औंसवर आले आहे. अमेरिकन सोने फ्युचर्स 0.2% वाढून 1,952 डॉलरवर होते.

सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचे कॉन्ट्रॅक्ट 0.16 टक्क्यांनी वाढून 10 ग्रॅमसाठी 52,499 रुपये होता. तर चांदी 0.08 टक्क्यांनी घसरून 67,074 रुपये प्रति किलो आली आहे. जरी मजबूत डॉलर आणि अमेरिकन बॉंड्सच्या परताव्यातील वाढीचा सोन्यावर दबाव असला तरी युक्रेनच्या संकटामुळे निर्माण झालेली सुरक्षित गुंतवणूक प्रकारातील मागणी आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यामुळे या आठवड्यात सोने 52000-52700 रुपयांच्या पट्ट्यात व्यवहार करू शकते.  

आज सोने आणि चांदीच्या भावावर अमेरिकेतली रोजगाराची आकडेवारी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या भाषणाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तर युक्रेन-रशिया तणावामुळे सोने आणि चांदीला मागणीदेखील राहणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी