Gold and Silver Rate Today, 05 May 2022: नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम शुक्रवारी सकाळी भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. सोन्याच्या भावात आज मोठी घसरण झाली आणि व्यवहाराच्या सुरुवातीला सोने (Gold Price) 454 रुपयांनी स्वस्त झाले. दोन दिवसांत चांदीच्या भावात (Silver Price) देखील सुमारे 2000 रुपयांची घट झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदा भाव सकाळी 454 रुपयांनी घसरून 50,348 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 50,729 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता. पण मागणी कमी झाल्यामुळे लवकरच भाव आणखी घसरले. सोने सध्या 0.89 टक्क्यांनी घसरले आहे. (Gold prices fall, silver also drops amid global trends)
सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसन येते आहे. एमसीएक्सवर, चांदीचा भाव सकाळी 126 रुपयांनी घसरून 54,909 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 55,174 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु लवकरच त्याचे भाव 55 हजारांच्या खाली आले. चांदी सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.23 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहे. गुरुवारी सकाळी वायदे बाजारात चांदीचा भाव 57 हजारांच्या आसपास होता, जो आज 55 हजारांच्या खाली आला आहे.
अधिक वाचा : Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा 50 रुपये आणि मॅच्युरिटीला मिळवा 50 लाख
भारतीय वायदे बाजारातील घसरणीमुळे आज जागतिक बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,708.51 डॉलर प्रति औंस होती, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.22 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत 18.31 डॉलर प्रति औंस आहे, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.85 टक्के कमी आहे. जागतिक बाजारात चांदीची किंमत 27 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली होती.
अधिक वाचा : Bank Mergers : लवकरच 4-5 मोठ्या बँकांचे विलीनीकरण...सरकारी बॅंकांच्या विलीनीकरणाची योजना
अमेरिकेत सध्या अनेक मोठ्या आर्थिक घडामोडी घडत आहेत. एकीकडे डॉलरने 20 वर्षांचा उच्चांक गाठला असून त्यामुळे सोन्याच्या भावावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे, महागाई देखील 41 वर्षांच्या शिखरावर असून गुंतवणुकदार सोन्यापासून दूर गेले आहेत. याशिवाय व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणुकदारांना ठेवींवर चांगला परतावा मिळू लागला आहे, त्यामुळे सोन्यासारख्या मालमत्तेतील गुंतवणुकीपासून त्यांचे लक्ष विचलित झाले आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेवर रशिया-युक्रेन युद्धाचा दबाव कमी होताच सोन्याचे भाव पुन्हा वाढतील अशी चिन्हे आहेत.
अमेरिकेतील 10-वर्षांसाठीचा ट्रेझरी परतावा शुक्रवारी एक आठवड्याच्या उच्चांकीवर पोचला आहे. युरोपियन युनियनमधील महागाई, मंदीची भीती आणि ऊर्जा संकट यामुळे युरो गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आला आहे. गुंतवणुकदार या आठवड्यात जाहीर होणाऱ्या जूनसाठीच्या युनायटेड स्टेट्सच्या ग्राहक किंमत निर्देशांकाचीच री ओढतील अशी चिन्हे आहेत. वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जूनमध्ये ग्राहक किंमतींची आकडेवारी 40 वर्षांच्या उच्चांकावर जाईल, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.