Gold-Silver Rate Today, 14 July 2022:मोठी संधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा किती झाला भाव...

Gold and Silver Rate Today, 14 July 2022: जागतिक बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुरुवारी सकाळी भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज सोन्याचा भाव (Gold Price) 50,600 रुपये तर चांदीचा भाव (Silver Price)57 हजारांच्या खाली आला आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे फ्युचर्स 171 रुपयांनी घसरून 50,631 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात मोठी घसरण
  • चांदी भावदेखील उतरला
  • आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणुकदार सोन्यापासून थोडे लांब झाले

Gold and Silver Rate Today, 14 July 2022 : नवी दिल्ली: जागतिक बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुरुवारी सकाळी भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज सोन्याचा भाव (Gold Price) 50,600 रुपये तर चांदीचा भाव (Silver Price)57 हजारांच्या खाली आला आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे फ्युचर्स 171 रुपयांनी घसरून 50,631 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधी सोन्याचा भाव 50,725 रुपयांच्या पातळीवर पोचला होता. मात्र मागणी कमी झाल्यामुळे लवकरच भावात घसरण सुरू झाली. सोने सध्या 0.34 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. (Gold prices fall, silver also drops, check latets rates)

अधिक वाचा : Income Tax : आपल्या बँक खात्यात करू नका एवढे व्यवहार, नाही तर पडेल इन्कम टॅक्सची धाड

चांदीच्या भावामध्येही घसरण झाली

सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही नरमाई दिसून येत आहे. एमसीएक्सवर, चांदीची फ्युचर्स किंमत 273 रुपयांनी घसरून 56,854 रुपये प्रति किलो झाली. यापूर्वी, चांदीचा व्यवहार 56,950 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणी कमी झाल्यामुळे लवकरच भावात घसरण दिसून येऊ लागली. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.48 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहे.

अधिक वाचा : RBI Imposes Penalty on Ola: RBI ने ओलावर ठोकला दीड कोटीचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जागतिक बाजारपेठेत मंदी

आजच्या व्यवहारात जागतिक बाजारातही सोने-चांदीचे भाव सुस्त दिसत आहेत. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,726.92 डॉलर प्रति औंस होती, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.23 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत 19.11 डॉलर प्रति औंस आहे, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.02 टक्के कमी आहे. मार्चमध्ये जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 2,000 डॉलर आणि चांदीची किंमत 27 डॉलर प्रति औंस होती.

अधिक वाचा : मुंबईत सीएनजी ८० रुपये किलो आणि पीएनजी ४८.५० रुपये किलो

सोने अस्थिर आणि कमकुवत का होतंय

अमेरिकेत सध्या अनेक मोठ्या आर्थिक घडामोडी घडत आहेत. एकीकडे डॉलरने 20 वर्षांचा उच्चांक गाठला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत आहे. दुसरीकडे, महागाई देखील 41 वर्षांच्या शिखरावर असून गुंतवणूकदार सोन्यापासून दूर गेले आहेत. याशिवाय व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणुकदारांना ठेवींवर चांगला परतावा मिळू लागला आहे, त्यामुळे सोन्यासारख्या गुंतवणूक प्रकारापासून गुंतवणुकदार अंतर राखून आहेत.

डॉलरचे मूल्य 20 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोचले आहे. अमेरिकेतील 10-वर्षांसाठीचा ट्रेझरी परतावा शुक्रवारी एक आठवड्याच्या उच्चांकीवर पोचला आहे.  युरोपियन युनियनमधील महागाई, मंदीची भीती आणि ऊर्जा संकट यामुळे युरो गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आला आहे. गुंतवणुकदार या आठवड्यात जाहीर होणाऱ्या जूनसाठीच्या युनायटेड स्टेट्सच्या ग्राहक किंमत निर्देशांकाचीच री ओढतील अशी चिन्हे आहेत. वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जूनमध्ये ग्राहक किंमतींची आकडेवारी 40 वर्षांच्या उच्चांकावर जाईल, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले. मासिक कोर निर्देशांक मात्र मे महिन्यातील 6.0 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांपर्यंत घसरताना दिसतो आहे. अमेरिकन बेंचमार्क ट्रेझरी परताव्यातदेखील 3 टक्के वाढ झाल्यामुळे देखील सोने-चांदीच्या भावांवर दबाव आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी