Gold-Silver Rate Today, 08 August 2022 : सोन्याचा भाव स्थिर...अमेरिकेतील रोजगार, व्याजदर वाढीची शक्यता, डॉलरची मजबूती, जाणून घ्या विविध घटकांचा परिणाम

Gold and Silver Rate Today, 08 August 2022 : आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याचा भाव (Gold price) स्थिर आहे. अमेरिकेतील रोजगारासंदर्भात मागील आठवड्यात सकारात्मक ठोस अहवाल आल्यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve)आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता वाढवली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचे भाव स्थिर झाले तर डॉलरचे मूल्य वाढले आहे आणि अमेरिकन बॉंडचा परतावा वाढला आहे. याआधी जागतिक स्तरावर डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्यानंतर सोन्याचा भाव चार आठवड्यांच्या उच्चांकीवर पोचला होता.

Gold and Silver Rate Today: Gold price flat
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव स्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याचे भाव स्थिर
  • अमेरिकेतील रोजगाराची सकारात्मक आकडेवारीमुळे मंदीची भीती दूर
  • मजबूत डॉलर आणि बॉंडच्या वाढलेल्या परताव्यामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम

Gold and Silver Rate Today, 08 August 2022 : नवी दिल्ली : आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याचा भाव (Gold price) स्थिर आहे. अमेरिकेतील रोजगारासंदर्भात मागील आठवड्यात सकारात्मक ठोस अहवाल आल्यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve)आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता वाढवली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचे भाव स्थिर झाले तर डॉलरचे मूल्य वाढले आहे आणि अमेरिकन बॉंडचा परतावा वाढला आहे. याआधी जागतिक स्तरावर डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्यानंतर सोन्याचा भाव चार आठवड्यांच्या उच्चांकीवर पोचला होता. मात्र मागील काही दिवसांपासून अमेरिकेतील आकडेवारी आणि सोन्याच्या भावात रस्सीखेच सुरू आहे. (Gold prices remains flat amid prospect of  interest rate hikes by  US Fed, check latest rates)

अधिक वाचा : R Madhavan: एका वैज्ञानिकाची कथा मोठ्या पडद्यावर दाखवणे नव्हते सोपे, आर माधवनने उलगला रॉकेट्रीचा प्रवास

सोन्याच्या भावाशी निगडीत काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया-

* स्पॉट गोल्ड मागील सत्रात 1% घसरल्यानंतर प्रति औंस 1,774.09 डॉलरवर स्थिर होते.

* अमेरिकेतील सोन्याचे वायदे 1,790.60 डॉलरवर स्थिर होते.

* डॉलर इंडेक्स 106.77 वर होता. शुक्रवारच्या 106.93 च्या उच्चांकीजवळ निर्देशांक होता. हा 28 जुलैनंतरचा सर्वात मजबूत निर्देशांक आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे  इतर चलन धारकांसाठी सोने अधिक महाग होते.

* शुक्रवारी अमेरिकेतील 10-वर्षीय बेंचमार्क बॉंडचा परतावा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळातील त्यांच्या सर्वोच्च पातळीच्या जवळ पोचला.

अधिक वाचा : Mumbai : मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पाणीसाठा

* जुलैमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांच्या वाढीला अनपेक्षितपणे वेग आला. रोजगाराची पातळी त्याच्या कोरोना महामारीच्या आधीच्या पातळीपेक्षा वर आली आणि अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती कमी झाली. 

* केंद्रीय बँकेच्या उद्दिष्टाएवढी महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन फेडने येत्या बैठकीमध्ये आणखी 75-बेसिस-पॉइंट व्याजदर वाढीचा विचार केला पाहिजे, असे फेडचे गव्हर्नर मिशेल बोमन यांनी शनिवारी सांगितले.

*  यू.एस. फेडरल रिझर्व्ह वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी सप्टेंबर 21 रोजी होणाऱ्या त्यांच्या पुढील धोरणात्मक निर्णयासाठी 75-बेसिस-पॉइंट दर वाढीचा वेग कायम ठेवण्याची  73.5% संभाव्य शक्यता व्यापाऱ्यांना सध्या दिसते आहे.

* सोन्याकडे महागाई विरोधात बचावाचे साधन म्हणून पाहिले जात असले तरी, अमेरिकेतील वाढत्या व्याजदरामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला होता. 

अधिक वाचा : Weight Loss tips in Marathi: वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे पाच नियम आणि पहा फरक

* तैवानच्या भेटीच्या प्रतिक्रियेत सुरू करण्यात आलेल्या चार दिवसांच्या अभूतपूर्व चिनी लष्करी सरावाच्या नियोजित समाप्तीपूर्वी रविवारी चिनी आणि तैवानच्या युद्धनौकांमध्ये समुद्रात "मांजर आणि उंदराचा खळे झाला.

*  तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे गेल्या आठवड्यात सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून सोन्याच्या मागणीनुसार चीनमधील सोन्याचे प्रिमीयम वाढले, तर देशांतर्गत वाढलेल्या किंमतींमुळे भारतातील खरेदी व्यवहार थंड झाला.

* SPDR गोल्ड ट्रस्ट, जगातील सर्वात मोठा सोन्याचा आधार असलेला एक्सचेंज ट्रेडेड फंड, शुक्रवारी त्याचे होल्डिंग 0.12% घसरून 999.16 टन झाले.

* स्पॉट सिल्व्हर 0.2% कमी होऊन 19.83 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.2% घसरून 930 डॉलर आणि पॅलेडियम 2,125.69 डॉलरवर स्थिर होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी