Gold-Silver Rate Today, 25 July 2022: सोन्यावरील अस्थिरतेचे सावट कायम, चांदीच्या भावातदेखील घसरण, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 25 July 2022 : सोन्याच्या भावातील (Gold Price) अस्थिरता अजूनही कायम आहे. आजही सोन्याच्या भावात फारसा बदल न होता ते खालच्याच पातळीवर होते. अमेरिकन ट्रेझरीचा घटलेला परतावा आणि अमेरिकन डॉलरच्या घोडदौडीला लागलेला थोडासा लगाम यामुळे सोने आणि चांदीच्या भावाला थोडासा आधार मिळाला. मात्र तरीही या दोन्ही धातूंमधील अनिश्चितता कायम होती. चांदीच्या भावात (Silver price)मोठी घसरण झाली आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव अस्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावातील अस्थिरता सुरूच
  • चांदीच्या भावात मोठी घसरण
  • सर्वांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाकडे

Gold and Silver Rate Today, 25 July 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावातील (Gold Price) अस्थिरता अजूनही कायम आहे. आजही सोन्याच्या भावात फारसा बदल न होता ते खालच्याच पातळीवर होते. अमेरिकन ट्रेझरीचा घटलेला परतावा आणि अमेरिकन डॉलरच्या घोडदौडीला लागलेला थोडासा लगाम यामुळे सोने आणि चांदीच्या भावाला थोडासा आधार मिळाला. मात्र तरीही या दोन्ही धातूंमधील अनिश्चितता कायम होती. चांदीच्या भावात (Silver price)मोठी घसरण झाली आहे. मात्र व्यापाऱ्यांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हने 75-बेसिस-पॉइंट व्याजदर वाढवण्याच्या निर्णयाकडे लागलेले आहे. (Gold remains under pressure while silver prices drops amid global trends)

अधिक वाचा : ITR Filing: प्राप्तिकर विवरणपत्राची शेवटची तारीख, नेमका किती कर भरावा आणि कर नियोजन कसे करावे, जाणून घ्या

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे सर्वांचे लक्ष

चलनविषयक धोरणावर आणि पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात बैठक घेणार आहे. डॉलरच्या मूल्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इतर चलने असलेल्या खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग झाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत अमेरिकेतील व्याजदर 75 बेस पॉइंट्सने वाढण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा : ATM Safety Tips : एटीएम वापरणाऱ्यांनी या टिप्स लक्षात ठेवाव्यात, नाहीतर होईल फसवणूक...

सोन्याचा ताजा भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स किरकोळ 0.05 टक्‍क्‍यांनी किंवा 26 रुपयांनी 50,671 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. चांदीचा भाव मात्र 0.30 टक्क्यांनी घसरून 166 रुपयांनी 54,965 रुपये प्रति किलोवर बंद झाला. जरी सोन्याकडे चलनवाढीविरूद्ध बचाव म्हणून पाहिले जात असले तरी, वाढत्या व्याजदरामुळे सोने बाळगण्याचा  संधी खर्च वाढतो. त्यामुळे त्यातील फायद्यावर परिणाम होतो. 

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरातील वेगवान वाढ आणि डॉलरच्या मूल्यात नुकत्याच झालेल्या तेजीमुळे मार्चच्या सुरुवातीला 2,000 डॉलर प्रति औंस पातळीच्या वर पोचल्यापासून सोन्याच्या भाव 350 डॉलर किंवा 16 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 50,816 रुपयांच्या पातळीवर तर चांदीचा भाव  55,009 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. सोन्याच्या स्पॉट किमती गेल्या सत्रात सुमारे 850 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्या, तर चांदी प्रति किलो 1,100 रुपयांपेक्षा जास्त वाढली.

अधिक वाचा : ITR filing : तुमच्याकडे फॉर्म 16 नाही? नो टेन्शन! तरीही तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकता, पाहा कसे

महागाईमुळे सोन्याकडे कल

वाढत्या महागाईने गुंतवणुकदारांना महागाईविरोधात बचाव करणाऱ्या मालमत्ता आणि गुंतवणूक प्रकारांकडे  वळवले आहे. डॉलरची उच्चांकावरून विक्री होते आहे आणि अमेरिकेच्या आर्थिक वाढीवरील चिंतेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे, असे मत शेअर इंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांनी व्यक्त केले आहे.

"मात्र मोठ्या मध्यवर्ती बँकांकडून करण्यात आलेली आक्रमक दरवाढ आणि कडक वित्तीय उपाय सोन्याला मोठा प्रतिकार म्हणून काम करतील. औद्योगिक धातू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील मंदीमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे." असे ते पुढे म्हणाले.

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरल्यानंतर, प्रति औंस 1,725.17 डॉलरच्या पातळीवर स्थिर होते. शुक्रवारी स्पॉट गोल्ड एका आठवड्यापेक्षा जास्त उच्चांकावर पोचला होता. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून 1,723.40 डॉलर प्रति औंस झाले. स्पॉट सिल्व्हर प्रति औंस 18.58 डॉलरवर स्थिर होते. प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी घसरून 871.43 डॉलर आणि पॅलेडियम 1.5 टक्क्यांनी घसरून 2,001.62 डॉलरवर आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी