मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढपाडव्यापूर्वी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,487 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 68,409 रुपये आहे. (Gold prices rise, silver becomes cheaper, know today's rate)
अधिक वाचा : गुढीपाडव्यासाठी बघा नवीन पदार्थ
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सोमवारी संध्याकाळी 59,479 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59,487 रुपयांवर आला आहे. तसेच शुद्धतेच्या आधारावर सोने किरकोळ महागले असून चांदी स्वस्त झाली आहे.
अधिक वाचा : Video: गुढी पाडवा साजरा करण्यासाठी दारापुढे काढा ही रांगोळी
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी ९९५ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५९२४९ रुपये झाली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 54490 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 44615 वर आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे सोने महाग होऊन आज 34,800 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 68409 रुपये झाला आहे.
अधिक वाचा : Happy gudi padwa: गुढीपाडव्यानिमित्त HD Images शेअर करा
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.