Gold-Silver Rate Today, 05 August 2022: सोन्याच्या भावात वाढ, चांदीदेखील वधारली, पटापट चेक करा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 05 August 2022: देशातील बाजारपेठेत सोन्याच्या भावात (Gold Price) आज वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 51,820 रुपये आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात 380 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदी कालच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढून 57,700 रुपयांना विकली जाते आहे.

Gold and Silver Rate Today: Gold Price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या आज पुन्हा वाढ झाली
  • चांदीदेखील वधारली
  • जागतिक घटकांच्या हिंदोळ्यावर सोन्याच्या भावात अस्थिरता

Gold and Silver Rate Today, 05 August 2022: नवी दिल्ली : देशातील बाजारपेठेत सोन्याच्या भावात (Gold Price) आज वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावातदेखील (Silver Price) वाढ झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 51,820 रुपये आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात 380 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदी कालच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढून 57,700 रुपयांना विकली जाते आहे. राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेस यासारख्या घटकांमुळे, जास्त मागणी असलेल्या धातूची किंमत दररोज बदलते. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 47,500 रुपयांना विकले जाते आहे.  (Gold prices rises and Silver also gains, check latest rates)

अधिक वाचा : Vice Presidential Election : उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी मतदान

सोन्याचा ताजा भाव

याच प्रमाणात मागणी असलेल्या 22 कॅरेट सोन्याच्या भाव नवी दिल्लीत 47,650 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,250 रुपये आहे. 24-कॅरेट सोन्याचा भाव पाहिल्यास, कोलकाता आणि मुंबईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा व्यवहार 51,820 रुपयांना होत आहे. चेन्नईमध्ये 52,640 रुपयांना 24-कॅरेट शुद्धतेची समान मात्रा खरेदी केली जात आहे. नवी दिल्लीत त्याची किंमत 51,980 रुपये आहे.

अधिक वाचा : Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव

देशाच्या विविध शहरातील सोन्याचा भाव

वडोदरा आणि कोईम्बतूरमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 47,530 रुपये आणि 48,250 रुपये आहे. 24-कॅरेट सोन्याचा भाव वडोदरा येथे 51,580 रुपये आणि कोईम्बतूरमध्ये 52,640 रुपये आहे. केरळ, भुवनेश्वर आणि हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 47,500 रुपयांना विकले जाते आहे. बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरूमध्ये सोन्याचा भाव 47,550 रुपये इतका आहे. केरळ, भुवनेश्वर आणि हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,820 रुपये आहे. बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 51,880 रुपयांना व्यवहार होतो आहे.

अधिक वाचा : एकमेकांसोबत लग्न न झाल्याचं होतं दु:ख; नैराश्यात विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

पाटणा आणि चंदीगडमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची खरेदी अनुक्रमे 47,530 रुपये आणि 47,650 रुपये आहे. पाटणामध्ये, 24-कॅरेट सोन्याची किंमत 51,580 रुपये आहे. तर चंदीगडमध्ये 24-कॅरेट सोन्याची किंमत 51,980 रुपये आहे. मदुराई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची खरेदी 48,250 आणि 47,530 रुपयांना होते आहे. मदुराईमध्ये 24-कॅरेट सोने 52,640 रुपयांना विकले जात आहे. पुण्यात सोन्याचा भाव 51,580 रुपये आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सच्या (MCX) च्या अलीकडील आकडेवारीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी मॅच्युअर्ड होणारे सोन्याचे फ्युचर्स 0.14 टक्क्यांनी घसरून 52,090.00 रुपये झाले. 5 सप्टेंबर रोजी मॅच्युअर्ड होणारे चांदीचे वायदे 0.22 टक्क्यांनी वाढल्यानंतर 58,110.00 रुपयांवर पोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोन्याचा भाव स्थिर होता, कारण त्याला यूएस ट्रेझरी उत्पन्नातील पुलबॅकमुळे पाठिंबा मिळाला आणि सावध गुंतवणूकदारांनी या आठवड्यात यूएस नॉन-फार्म पेरोल अहवालाची वाट पाहिली. सर्वांचेच लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी