आनंदाची बातमी!  सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, पाहा काय आहे आजचा भाव 

काम-धंदा
Updated Sep 11, 2019 | 17:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

गणेशोत्सवात प्रति १० ग्रॅमला ४० हजार रुपयांच्या उच्चांकी दर गाठल्यानंतर सोन्याच्या दरात घट होताना दिसत आहे. 

gold prices today down 1730 from highs silver rates fall further
सोने-चांदीत घट  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई :  मागील काही दिवसात सोन्या चांदी दरात झालेली वाढ आता काही प्रमाणात खाली येताना दिसत आहे. गणपतीची आगमनानंतर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमला ४० हजारांच्या जवळ गेला होता. आता त्यात घट होताना दिसत आहे. तसेच चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी चांदीच्या दरात प्रतिकिलो १४०० रुपयांनी केली आहे. 

बुधवारी सोन्याची किंमत ०.२६ टक्क्यांनी घट दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात सोने ३९ हजार २७८ रुपयांवर गेले होते. बुधवारी सोने प्रति दहा ग्रॅमला १७३० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी घट आहे. आता सोन्याची किंमत प्रति तोळा ३८ हजार १५४ रुपये झाली आहे. रुपया मजबूत झाला आणि सोन्याची मागणी कमी झाल्याने ही घट दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. 

सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. चांदीच्या किंमतीत ०.२३ टक्क्यांनी घट दिसून आली त्यामुळे चांदी प्रति किलो ३८०० रुपयांनी कमी झाली आहे. बुधवारी चांदीच्या दर प्रति किलो ४७ हजार ६८६ रुपयांपर्यंत खाली आला. हा दर गेल्या आठवड्यात प्रति किलो ५१४८९ रुपये होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १५५० डॉलर होता. बुधवारी हा दर १४९१ डॉलर प्रति औंस झाला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात सुमारे २४ टक्के तर चांदीच्या दरात २१ टक्क्यांनी वाढ दिसून आली. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे ही वाढ दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मंदी असल्यामुळे हे दर वाढले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी