Gold Purchasing | सोने खरेदी करताना जाणून घ्या, खरे बिल कसे असते, रिसिटमध्ये या बाबी आहे की नाही ते तपासा

Gold Purchasing | ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS)च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सराफाकडून मिळालेल्या बिल किंवा चलानमध्ये हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंची माहिती व्यवस्थित दिलेली असली पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांच्या बिलात प्रत्येक वस्तूचे विवरण, किंमतीची माहिती, शुद्धता, धातूचे शुद्ध वजन, कॅरेट आणि हॉलमार्किंग चार्ज यांचा उल्लेख असला पाहिजे.

Gold Purchasing
सोने खरेदी 
थोडं पण कामाचं
  • सोने खरेदी करणार असाल तर काही बाबी जाणून घ्या.
  • सोन्याचे दागिने (Gold Jewellery) खरेदी करणार असाल त्यावर हॉलमार्किंग आहे की नाही हे तपासून घ्या
  • योग्य आणि खरे बिल घेऊनच सोने खरेदी करा

Gold Purchasing | नवी दिल्ली: दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी (Gold Investment) केली जाते. तुम्हीदेखील सोने खरेदी करणार असाल तर काही बाबी जाणून घ्या. तुम्ही जे सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold Jewellery) खरेदी करणार असाल त्यावर हॉलमार्किंग आहे की नाही हे तपासून घ्या. हॉलमार्किंग (Gold Hallmarking) असल्यास सोन्याच्या शुद्धतेची खात्री होते. दुसरी बाब सोने खरेदीच्या बिलासंदर्भातील आहे. बिलाशिवाय (Bill for Gold purchasing)सोने खरेदी करू नका. जीएसटी कर वाचवण्यासाठी बिल टाळले जाते. योग्य आणि खरे बिल घेऊनच सोने खरेदी करा. मात्र जर त्या दागिन्यांमध्ये काही खोट किंवा अडचण निर्माण झाली तर बिलाशिवाय सराफ ते दागिने स्वीकारणार नाही. ते दागिने विकताना तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. (Gold Purchasing | While purchasing the gold or gold Jewellery, always take the Bill & check the Bill details) 

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS)नुसार रिटेलर किंवा सराफाकडून दागिने विकत घेतल्यास त्याच्याकडून योग्य बिल किंवा इन्व्हॉइस ग्राहकांनी नक्की घेतले पाहिजे. कोणत्याही प्रकारची तक्रार दूर करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. त्यामुळे हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचे बिल कसे असले पाहिजे आणि त्यात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख असला पाहिजे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

काय आहे बीआयएसच्या सूचना

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS)च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सराफाकडून मिळालेल्या बिल किंवा चलानमध्ये हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंची माहिती व्यवस्थित दिलेली असली पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांच्या बिलात प्रत्येक वस्तूचे विवरण, किंमतीची माहिती, शुद्धता, धातूचे शुद्ध वजन, कॅरेट आणि हॉलमार्किंग चार्ज यांचा उल्लेख असला पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंच्या बिलात असेही लिहिलेले असले पाहिजे की ग्राहक हॉलमार्क असणाऱ्या दागिने किंवा वस्तूंच्या शुद्धतेला बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही केंद्रात तपासू शकतात.

कसे असावे बिल

समजा तुम्ही सराफाकडून सोन्याचे दागिने खरेदी केले. तुम्ही १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची चैन खरेदी केली. अशावेळी तुमच्या बिलात पुढीलप्रमाणे माहिती असायला हवी.

वस्तूचे नाव - सोन्याची चैन

संख्या- १
वजन- १० ग्रॅम
शुद्धता- २२ कॅरेट
सध्याचा सोन्याचा भाव आणि मेकिंग चार्ज
हॉलमार्किंगचे शुल्क- ३५ रुपये + जीएसटी
ग्राहकाने द्यावयाची एकूण रक्कम

कच्चे किंवा कामचालऊ बिलापासून सावधान

अनेकवेळा दुकानदार ग्राहकांना कच्चे किंवा कामचलाऊ बिल देतात. यामध्ये अटी दिलेल्या नसतात. कामचलाऊ किंवा कच्चे बिल म्हणजे असे बिल जे व्यापारी ऑडिटमध्ये दाखवत नाहीत. असे करून कर चुकवेगिरी केली जाते. ग्राहकादेखील कर वाचवण्याच्या मोहात पाडून कच्चे बिल दिले जाते. कच्च्या बिलात वर उल्लेख केलेली सर्व माहिती नसते. कच्च्या बिलाच्या आधारावर भविष्यात त्या दागिन्यासंदर्भात विक्री किंवा अडचण निर्माण झाल्यास कच्चे बिल ग्राह्य धरले जात नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी