सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव 

Gold Rate: जागतिक बाजारात कमकुवत वातावरणामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. लग्नसराईच्या सिझनमध्ये सोने आणि चांदीच्या भावात घट ग्राहकांना आकर्षित करू शकते. जाणून घ्या काय आहे सोन्या-चांद

gold rate down by rs 301 per 10 gram silver by rs 906 on 6 november business news in marathi google newsstand
सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : जागतिक बाजारात नरम वातावरणामुळे बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर ३०१ रुपयांनी कमी होऊ प्रति १० ग्रॅमला ३८,८७० रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. चांदीच्या तांत्रिक सुधार होऊन ती ९०६ रुपयांनी स्वस्त होऊ प्रति एक किलोला चांदीचा दर ४७ हजार ४१५ रुपये झाला. मंगळवारी सोने ३९,१७१ रुपयांवर बंद झाले होते. 

एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात काल रात्री घट दिसून आली त्यामुळे दिल्ली २४ कॅरेट सोन्याचे भाव ३०१ रुपयांनी कमी झाले. रुपयांच्या विनिमय दरात नरमी आल्याने सोन्यातील घट काही प्रमाणात कमी झाली. त्यांनी सांगितले की परदेशी विनिमयात हाजीर बाजारात रुपयांचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २५ पैशांची कमकुवत सुरू आहे. 

जागतिक बाजारात सोन्याचा दर १४८६ डॉलर प्रति औंसवर पोहचला. चांदी पण १७.५४ डॉलर प्रति औंस च्या खालच्या स्तरावर होती.  मजबूत जागतिक कल पाहता सट्टेबाजांनी सौदा वाढविल्याने बुधवारी वायदा बाजारात सोन्याचा भाव ९४ रुपयांनी वाढून ३७,९७५ रुपये दहा ग्रॅमसाठी झाला. 

मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये डिसेंबर महिन्याची डिलीवरीचे सोने ९४ म्हणजे ०.२५ टक्क्यांनी वाढून ३७,९७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. यात १८०७ लॉट व्यापार झाला. तर फेब्रुवारीचा डिलेव्हरीचे सोने ६७ रुपयांनी म्हणजे ०.१८ टक्यांनी वाढून ३८,०८४ रुपेय प्रति दहा ग्रॅमवर पोहचले आहे. या ३६२ लॉटचा व्यापार झाला. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्य सोने ०.१४ टक्के वाढून १४८५.८० डॉलर प्रति औंस झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी