Gold Rate Today, 14 November 2019: इतक्यावर पोहचला सोन्या-चांदीचा दर, जाणून घ्या सराफा बाजारातील भाव

काम-धंदा
Updated Nov 14, 2019 | 19:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Rate/Price Today (सोन्याचा आजचा भाव) 14 November 2019 : गुरूवारी रुपया मजबूत झाल्याने त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरात झाला. त्यामुळे याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर भाव एक नजर टाकू या 

gold rate in delhi ncr mumbai hallmark 22 carat gold price in delhi ncr 14 november gold new rate business news in marathi google newsstand
Gold Rate Today, 14 November 2019: इतक्यावर पोहचला सोन्या-चांदीचा दर, जाणून घ्या सराफा बाजारातील भाव 

नवी दिल्ली :  राष्ट्रीय राजधानीमध्ये सोन्याच्या दरात गुरूवारी १५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ३८,९९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचली आहे. रुपयाचे मूल्या वाढल्याने  घरगुती बाजारात सोन्याचा भावात तेजी अंकुश लागला. बुधवारी पिवळ्या धातूची किंमत ३८,९८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा हाजीर मूल्यात १५ रुपये तेजी आली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे मुल्य वाढल्याने सोन्याच्या तेजीत अकुंश लागले.  दिवसभरातील कारभारात डॉलरच्या तुलनेत १६ पैसे रुपयांत मजबूती आली.

चांदीच्या किंमतीत ५० रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळे एक किलो चांदीची किंमत ४५,७२६ रुपये झाली आहे. वैश्विक बाजारात सोने १४६६.५० डॉलर प्रति औंस आणि चांदी १६.९७ डॉलर प्रति औंसवर आहे. पटेल यांनी सांगितले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-चीन व्यापार करारसंबंधी गोष्ट स्पष्ट ने केल्याने गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची खरेदी वाढली. 

अमेरिका आणि चीन व्यापार करारासंदर्भात चिंता आणि हॉंगकाँगमध्ये राजकीय विरोधी आंदोलन उग्र झाल्याने  चीनचे कमकुवत उत्पादन आकडे आले. त्यामुळे सराफा बाजारातील किंमतींना समर्थन मिळाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी