Gold Rate Today, 29 November 2019: सोन्याच्या किंमती झाला बदल, जाणून घ्या काय आहे सोन्या चांदीचा भाव 

काम-धंदा
Updated Nov 29, 2019 | 21:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Rate/Price Today (गोल्ड रेट टुडे) 29 November 2019: अमेरिकेकडून हाँगकाँगसंबंधी पारीत करण्यात आलेल्या विधेयक आणि रुपयाच्या मूल्यात झालेल्या घटीमुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून आली.

gold rate in delhi ncr mumbai hallmark 24 carat gold price in delhi ncr 29 november 2019 gold new rate business news in marathi google newsstand
सोन्याच्या किंमती झाला बदल, जाणून घ्या काय आहे सोन्या चांदीचा भाव   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली :  लग्नसराईमुळे वाढलेल्या मागणीमुळे तसेच सकारात्मक वैश्विक संकेत आणि रुपयाच्या मूल्यात आलेली घट यामुळे दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत १४३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३८ हजार ६९५रुपये प्रती १० ग्रॅम झाला आहे. बाजारातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, भारतात लग्न समारंभाच्या सिझनमुळे मागणी वाढली आहे.  तसेच रुपयांच्या मूल्यात घट आली आहे. आणि अमेरिका चीन ट्रेड स्टॅंड ऑफ मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत आलेली सकारात्मकता त्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १७८ रुपयांची वरची बोली बोलली गेली. 

गुरूवारी सोन्याचा भाव ३८,५३५ प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. शुक्रवारीच्या कारभारात चांदीही १०८ रुपयांच्या तेजीने ४५३७५ रुपये प्रति किलोग्रॅमवर वर गेली. गेल्या सत्रात हा दर ४५२६७ रुपये प्रति किलोग्रॅम होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात नरमी होती. सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव १४५८ डॉलर प्रति औंस तर चांदी १६.९२ डॉलर प्रति औंस होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी