Gold Price Today: सोने स्थिर, चांदी मात्र ६३,००० रुपयांखाली, पाहा काय आहे भाव

Gold Investment : सोन्याचा भाव (Gold Price)आज म्हणजे शुक्रवारी स्थिर आहे. मात्र सोन्यामध्ये नोव्हेंबर 2021 नंतरच्या सर्वात तीव्र साप्ताहिक घसरणीची शक्यता आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) 2022 साठी धोरण कडक करण्याच्या योजना बाजाराने पचवल्या. त्यामुळे डॉलर निर्देशांक अनेक महिन्यांच्या शिखरावर गेला. MCX वर सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी किंवा 46 रुपयांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोन्याचे भाव स्थिर मात्र चांदीच्या भावात घसरण
  • MCX वर सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी किंवा 46 रुपयांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 48,528 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 62,687 रुपये प्रति किलो

Gold Price Today 28 January: नवी दिल्ली : सोन्याचा भाव (Gold Price)आज म्हणजे शुक्रवारी स्थिर आहे. मात्र सोन्यामध्ये नोव्हेंबर 2021 नंतरच्या सर्वात तीव्र साप्ताहिक घसरणीची शक्यता आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) 2022 साठी धोरण कडक करण्याच्या योजना बाजाराने पचवल्या. त्यामुळे डॉलर निर्देशांक अनेक महिन्यांच्या शिखरावर गेला. MCX वर सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी किंवा 46 रुपयांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीचा भाव (Silver Price) 0.15 टक्क्यांनी वाढून 92 रुपयांनी 62,036 रुपये प्रतिकिलो झाला. (Gold rate stable but silver fall below Rs 63,000, check the latest rate)

सोने स्थिर चांदी घसरली

कोटक सिक्युरिटीजमधील कमोडिटी रिसर्चचे प्रमुख रवींद्र राव यांनी सांगितले की, जुलै 2020 च्या उच्चांकी रॅलीनंतर यूएस डॉलर निर्देशांक थांबल्याने सोने वाढले. तसेच वाढता भू-राजकीय तणाव, वाढता महागाईचा दबाव आणि इक्विटीमधील घसरण हे आधारभूत किमती आहेत. "अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ करण्याच्या अपेक्षांमुळे बाजारावर लगेच परिणाम झाला. सोन्याच्या भावात घसरणीनंतर स्थिरता आली आहे. आगामी काळात सोन्यात घसरण होतच जाण्याची मात्र शक्यता नाही.' असे ते पुढे म्हणाले.

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 48,528 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 62,687 रुपये प्रति किलो होता. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या स्पॉट किंमती जवळपास स्थिर आहेत, तर गेल्या तीन सत्रांमध्ये चांदी 2,250 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त घसरली आहे.

गोल्ड ट्रेडिंग

उच्च उत्पन्न आणि व्याजदर वाढीमुळे बिनव्याजी सोने धारण करण्याच्या संधी खर्चात वाढ होऊन सराफा आकर्षित होतात, असे ShareIndia चे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांनी सांगितले. सोने 47,700 रुपयांपर्यंत मंदीचा कल कायम ठेवू शकते. 48,500 रुपयांच्या लक्ष्यासाठी 48,200 रुपयांच्या जवळ सोने खरेदी करण्याचा आणि 47,640 रुपयांच्या लक्ष्यासाठी 47,700 रुपयांच्या खाली विक्री करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड  1,796.41 डॉलर प्रति औंस वर होते. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी वाढून 1,796 डॉलरवर होते. या आठवड्यासाठी सोने सुमारे 2 टक्क्यांनी घसरले. ही 26 नोव्हेंबरनंतरची सर्वात वाईट घसरण. स्पॉट चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 22.69 डॉलरप्रति औंस झाली. प्लॅटिनम 0.1 टक्क्यांनी वाढून 1,023.49 डॉलरवर आणि पॅलेडियम 2,375.18 डॉलरवर होते.

हॉलमार्कचे महत्त्व

सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क पाहूनच सोन्याचे दागिने खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी