Gold Rate: सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, पाहा आजचा दर

काम-धंदा
Updated Aug 12, 2019 | 18:44 IST

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती रुपये आहे.

Gold price increased
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ
  • सोन्याच्या दराने गाठला उच्चांक
  • चांदीच्या दरात घसरण
  • सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
  • अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध सोन्याच्या दरात वाढ होण्यास कारणीभूत

नवी दिल्ली: सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या दराने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दराने आज (१२ ऑगस्ट २०१९) ३८,४७० रुपये प्रति दहा ग्रॅम इतक्या उच्चांक गाठला आहे. दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात ५० रुपये प्रति तोळा इतकी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी सोन्याचा दर ३८,४७० रुपयांवर पोहोचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या हालचालींमुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. एकिकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र, घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. चांदीच्या दरात ११५० रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे चांदीचा दर ४२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. शिक्का निर्माते आणि इंडस्ट्रीकडून होणारी चांदीची मागणी कमी झाल्याने ही घसरण झाली आहे. 

बाजारातील तज्ञांच्या मते, स्थानिक मागणी आणि सकारात्मक ग्लोबल ट्रेंड यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर १५०३ डॉलरहून अधिक ट्रेंड करत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे सुद्धा सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी शुक्रवारी म्हटलं की, अमेरिका चीनसोबत डील करण्यास तयार नाहीये. या कारणामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे.

भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धथा असलेल्या सोन्याच्या दरात प्रत्येकी ५० रुपयांनी वाढ झाली. परिणामी या सोन्याचा दर ३८,४७० रुपये आणि ३८,३०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. तयार चांदीच्या दरात ९० रुपयांनी वाढ झाली आणि त्यामुळे या चांदीचा दर ४३,००० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या शिक्क्यांची किंमत लिलाव ८८,००० रुपये आणि विक्री ८९,००० रुपये प्रति शेकडा इतकी राहिली.

शनिवारी सुद्धा सोनं महागलं

शनिवारी सोन्याच्या दरात ९० रुपयांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं. यामुळे सोन्याचा दर ३८,४२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीच्या दरातही शनिवारी १४० रुपयांनी वाढ झाली होती. या दरवाढीमुळे चांदीचा दर ४४,१५० रुपयांवर पोहोचला होता. मात्र, आता सोमवारी चांदीच्या दरात १,१५० रुपयांनी घसरण झाली आहे त्यामुळे चांदीचा दर ४३,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

शुक्रवारी झाली होती सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीत शुक्रवारी सोन्याच्या दराने १४० रुपयांनी घसरण झाली होती. यामुळे सोन्याचा दर शुक्रवारी ३८,००० रुपयांवरुन ३८,३३० रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली होती. चांदीच्या दरात शुक्रवारी २१० रुपयांनी घसरण झाली होती. या घसरणीमुळे शुक्रवारी चांदीचा दर ४४,०१० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...