खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

काम-धंदा
Updated Aug 14, 2019 | 19:09 IST

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत होती. त्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचा दर.

Gold Rate falls
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
  • सोन्याच्या दरात घसरण
  • गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू होती वाढ
  • रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात घसरण
  • पाहा सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झालीय

मुंबई: सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. कारण सोन्याच्या दरात बुधवारी (१४ ऑगस्ट) घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत होती. सोन्याचे दर केवळ वाढत नव्हते तर सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांकही गाठला होता. आगामी काळात सोन्याचा दर ४०,००० रुपयांचा टप्पा गाठेल असाही अंदाज वर्तवण्यात येत होता. पण त्याच दरम्यान आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याची बातमी आली आहे. 

सोन्याचा दर किती रुपयांवर?

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी (१४ ऑगस्ट) सोन्याच्या दरात ४२५ रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम ३७,९४५ रुपयांवर पोहोचला आहे. परदेशात सोन्याच्या दरात असलेल्या तेजीमुळे स्थानिक पातळीवर दागिने विक्रेत्यांकडून मागणी कमी झाली आणि त्यामुळेच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सोनंच नाही तर चांदीही झाली स्वस्त

केवळ सोन्याच्या दरात नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. अखिल भारतील सराफा संघानुसार, शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात ६९० रुपयांनी घसरण झाली आहे त्यामुळे चांदीचा दर ४४,३१० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. 

...म्हणून सोन्याच्या घसरणीला लागला ब्रेक

सराफा संघाने सांगितले की, स्थानिक बाजारात दागिने विक्रेत्यांकडून होणाऱ्या मागणीत कमी झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र परदेशात सकारात्मकता आणि तेजी असल्यामुळे सोन्याच्या दरात होणाऱ्या घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात तेजी होऊन १,५०९.०९ डॉलर प्रति औंस इतका झाला. तर चांदीचा दर १७.२२ डॉलर प्रति औंस इतका राहिला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ४२५-४२५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३७,९४५ रुपये आणि ३७,७७५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला.

चांदीच्या दरात ६९० रुपयांनी घसरण झाली आणि त्यामुळे चांदीचा दर २८,७०० रुपये इतका झाला. चांदीच्या शिक्क्यांच्या दरात १,००० रुपयांनी घसरण झाली त्यामुळे चांदीचा लिलाव ८८,००० रुपये आणि विक्री ८९,००० रुपये प्रति शेकडावर बंद झाला.

सोमवारी किती होता सोन्याचा भाव?

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती त्यामुळे सोन्याचा दर ३८,४७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी सोन्याचा दर ३८,४७० रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात सोमवारी १,१५० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदीचा दर ४२ हजार रुपयांवर पोहोचला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर Description: Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत होती. त्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचा दर.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...