Gold Rate: जाणून घ्या दिवाळीत काय आहे सोनं-चांदीचा भाव

Gold Price in Diwali: दिवाळीला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. आता दिवाळीत सोनं-चांदीचे दर काय आहेत हे जाणून घेऊयात...

gold rate today 25 october dhanatrayodashi diwali mumbai delhi sarafa bazar business news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दिवाळीत सोनं खरेदीकडे नागरिकांचा कल
  • सोनं-चांदीच्या दरात वाढ 
  • जाणून घ्या काय आहे सोनं-चांदीचा भाव 

नवी दिल्ली: दिवाळी आणि सणासुदीच्या काळात सोनं-चांदीची मोठी मागणी वाढली आहे. वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, धनत्रयोदशीत सोनं खरेदी वाढल्याने सोन्याच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याचा दर ३९,२४० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ३९,०२० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. सणासुदीच्या काळात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात ६७० रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा दर ४७,६८० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. गुरवारी चांदीचा दर हा ४७,०१० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. एचडीएफसी सिक्युरिटीच्या तपन पटेल यांनी सांगितले की, धनत्रयोदशीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत सोन्याचा दर ३९,२४० रुपयांवर पोहोचला आहे.

दिवाळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी आणि इतर धातुंच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. सणासुदीच्या काळात सोनं-चांदी ची मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १५०६ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे तर चांदीचा दर १८.०५ डॉलर एक औंसवर पोहोचला आहे. तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली अनिश्चितता आणि सोन्याची वाढलेली मागणी या सर्वांमुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यात आता दिवाळी सारख्या सणात दागदागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक वाढते परिणामी सोनं-चांदीच्या दरात आणखीन वाढ होत आहे. येत्या काळात सोनं-चांदीचे दर आणखीन वाढतील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी