खुशखबर: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी सुद्धा झाली स्वस्त

काम-धंदा
Updated Apr 18, 2019 | 21:17 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Gold rate today: गुरूवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. केवळ सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जाणून घ्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा दर किती आहे.

Gold and Silver price falls
सोन्याच्या दरात मोठी घसरण  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई: लग्नसराईचा काळ सध्या सुरू आहे. या लग्नसराईत तुम्ही सोनं किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात गुरूवारी मोठी घसरण झाली आहे. स्थानिक ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्याने गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात ४०५ रुपयांनी घसरण झाली आहे, यामुळे सोन्याचा दर ३२,३८५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. अखिल भारतीय सराफा संघाने ही माहिती दिली आहे.

शिक्का निर्मात्यांकडून होणाऱ्या मागणीतही घट झाली आहे. यामुळे चांदीच्या दरात १०४ रुपयांनी घसरण झाली आहे. परिणामी चांदीचा दर ३८,२४६ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक ज्वेलर्सकडून होणारी मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्यात येते. मात्र, यावेळी सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीतही घट झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर १,२७६.१० डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. तर, चांदीचा दर १५.१० डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. बुधवारी महावीर जयंती असल्याने दिल्लीतील सराफा बाजार बंद होतं. त्यानंतर गुरूवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

गुरूवारी ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ४०५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत ३२,३८५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर, ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ३९५ रुपयांनी घसरण झाली आणि हा दर ३२,२२५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.

याच प्रकारे चांदीच्या दरात १०४ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३८,२४६ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. लग्नसराईचा काळ सुरू असताना सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याने याला फायदा नागरिकांना होणार आहे. तसेच या घसरणीमुळे येत्या काळात सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
खुशखबर: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी सुद्धा झाली स्वस्त Description: Gold rate today: गुरूवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. केवळ सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जाणून घ्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा दर किती आहे.
Loading...
Loading...
Loading...