Gold Price Today: सोने झाले स्वस्त, चांदीतही मोठी घसरण , जाणून घ्या संध्याकाळचे भाव

 Today Retail Gold and Silver Rate| सोने चांदी दर : एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 121 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट होऊन 50,630 रुपयांवर पोहचला.

gold rate today gold price declines silver also becomes cheaper
Gold Price Today: सोने झाले स्वस्त, चांदीतही मोठी घसरण 

नवी दिल्ली :  सोने आणि चांदीच्या किंमतीत गुरूवारी घट पाहायला मिळाली.  एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 121 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट होऊन 50,630 रुपयांवर पोहचला.  या प्रमाणे गेल्या सत्रात दिल्लीत सोन्याचा दर (Gold Price) 50,75132 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. 

सराफा बाजारात सोन्यासोबत चांदीतही जबरदस्त वाढ दिसून आली.  चांदी किंमत 1,277 रुपयांची जबरदस्त घटीसह 60,098 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली होती. यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 61,375 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

वैश्विक बाजारात सोने-चांदीची कीमत

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत  वाढ दिसून आली. सोन्याची किंमत 1,878  डॉलर प्रति औंस होती. तर चांदीची किंमत 23.30  डॉलर प्रति औंसवर होती. 

एचडीएफसीसिक्युरिटीचे सीनिअर अनालिसिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत मजबूत रिकव्हरी झाल्याने सोन्याची किंमतीवर दबाव पाहायला मिळाला. त्यामुळे सोने स्वस्त झाले. 


महाराष्ट्रात सोने स्वस्त, चांदीत वाढ

सोन्याच्या दरात सुरूवातीच्या कारभारात घट दिसून आली. सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 170  रुपयांनी स्वस्त झाले. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,680 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर  49,680 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,850 रुपयांवर बंद झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,850 रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी  चांदीच्या दरात सुरूवातीला वाढ दिसून आली. चांदीत 10 रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल 62,400 वर असलेली चांदी 62, 410 रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ६८० ५० हजार ८५०
पुणे  ५० हजार ६८० ५० हजार ८५०
जळगाव  ५० हजार ६८० ५० हजार ८५०
कोल्हापूर ५० हजार ६८० ५० हजार ८५०
लातूर ५० हजार ६८० ५० हजार ८५०
सांगली ५० हजार ६८० ५० हजार ८५०
बारामती  ५० हजार ६८० ५० हजार ८५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०
पुणे  ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०
जळगाव  ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०
कोल्हापूर ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०
लातूर ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०
सांगली ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०
बारामती  ४९ हजार ६८० ४९ हजार ८५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६२ हजार ४१० ६२ हजार ४००
पुणे  ६२ हजार ४१० ६२ हजार ४००
जळगाव  ६२ हजार ४१० ६२ हजार ४००
कोल्हापूर ६२ हजार ४१० ६२ हजार ४००
लातूर ६२ हजार ४१० ६२ हजार ४००
सांगली ६२ हजार ४१० ६२ हजार ४००
बारामती  ६२ हजार ४१० ६२ हजार ४००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी