Gold Rate Today: सोन्याची किंमत वाढली, चांदीही चमकली, जाणून घ्या संध्याकाळचे भाव 

स्थानिक बाजारात गुरूवारी सोने आणि चांदीच्या  किंमतीत किरकोळ वाढ पाहायला मिळाली.

gold rate today gold price rise silver price also rise know the price
Gold Rate Today: सोन्याची किंमत वाढली, चांदीही चमकली 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक बाजारात गुरूवारी सोने आणि चांदीच्या  किंमतीत किरकोळ वाढ पाहायला मिळाली.
  • महाराष्ट्रात आज सोन्याच्या दरात घट दिसून आली.
  • सोन्याच्या दरात घट झाली असली तरी महाराष्ट्रात चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. 

मुंबई :  स्थानिक बाजारात गुरूवारी सोने आणि चांदीच्या  किंमतीत किरकोळ वाढ पाहायला मिळाली.  एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 17 रुपयांनी वाढून  48,257 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. गेल्या सत्रात हा दर 48,240  रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. दुसरीकडे चांदी 28 रुपयांच्या तेजीसह  59,513 रुपये प्रति किलो झाली होती. गेल्या सत्रात बुधवारी ती  58,380 रुपये प्रति किलोवर बंद होती.  

 दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1815  अमेरिकी डॉलर प्रति औंस आणि चांदी 23.42 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती. 
 

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, ‘‘रुपयात आलेल्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीतील वाढ कमी राहिली. त्यामुळे दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा हाजीर भाव केवळ 17 रुपये प्रति १० ग्रॅम वाढला. 
 

महाराष्ट्रात सोने कोसळले, चांदीत वाढ

महाराष्ट्रात आज सोन्याच्या दरात घट दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 1900 रुपयांनी घट झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 48,850 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 47,850 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,750 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,750  रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी महाराष्ट्रात चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे.  काल 60,000  वर असलेली चांदी आजही 60,050 रुपयांवर विकली जात आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ८५० ५० हजार ७५०
पुणे  ४८ हजार ८५० ५० हजार ७५०
जळगाव  ४८ हजार ८५० ५० हजार ७५०
कोल्हापूर ४८ हजार ८५० ५० हजार ७५०
लातूर ४८ हजार ८५० ५० हजार ७५०
सांगली ४८ हजार ८५० ५० हजार ७५०
बारामती  ४८ हजार ८५० ५० हजार ७५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०
पुणे  ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०
जळगाव  ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०
कोल्हापूर ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०
लातूर ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०
सांगली ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०
बारामती  ४९ हजार ७५० ४९ हजार ७५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६० हजार ००० ६० हजार ०५०
पुणे  ६० हजार ००० ६० हजार ०५०
जळगाव  ६० हजार ००० ६० हजार ०५०
कोल्हापूर ६० हजार ००० ६० हजार ०५०
लातूर ६० हजार ००० ६० हजार ०५०
सांगली ६० हजार ००० ६० हजार ०५०
बारामती  ६० हजार ००० ६० हजार ०५०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी