Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर

Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या दरात घसरण
  • दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर शुक्रवारी झाली घसरण
  • जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा भाव किती?

Today Gold rate in mumbai thane pune nagpur: सोने खरेदी करण्याचं प्लानिंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दोन दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यावर आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांनंतर शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. केवळ सोनेच नाही तर चांदीच्या भावातही घसरण झाली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा एप्रिल फ्युचर्समध्ये 232 रुपये म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरण झाली. यामुळे सोन्याचा भाव 57,170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. एमसीएक्सवर चांदीच्या फ्युचर्समध्ये 549 रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदीचा भाव 67,324 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला.

हे पण वाचा : हा किडा चावताच मांसाहारी लोक होतील शाकाहारी

सोन्याच्या भावात किती घसरण?

गूड रिटर्न्सनुसार, शुक्रवारी (10 फेब्रुवारी 2023) सोन्याच्या दरात 500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी घसरण झाली. या घसरणीमुळे 22 कॅरेट सोन्याचा भाव 52400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57160 रुपये इतका झाला.

हे पण वाचा : या दाम्पत्याने हनीमूनचा व्हिडिओच इंटरनेटवर पोस्ट केला अन्....

चांदीच्या दरातही घसरण

गूड रिटर्न्सनुसार, चांदीच्या भावातही शुक्रवारी घसरण झाली. चांदीच्या भावात 550 रुपयांनी घसरण झाल्याने चांदीचा भाव 70,800 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.

हे पण वाचा : सुतारकाम करणारी बिकिनी बेब पाहून व्हाल घायाळ

24 Carat Gold Rate Today : पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई 57 हजार 160  57 हजार 710
पुणे  57 हजार 160 57 हजार 710
जळगाव  57 हजार 160 57 हजार 710
कोल्हापूर 57 हजार 160 57 हजार 710
लातूर 57 हजार 160 57 हजार 710
सांगली 57 हजार 160 57 हजार 710
बारामती  57 हजार 160 57 हजार 710

22 Carat Gold Rate Today : पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई 52 हजार 400  52 हजार 900
पुणे  52 हजार 400 52 हजार 900
जळगाव  52 हजार 400 52 हजार 900
कोल्हापूर 52 हजार 400 52 हजार 900
लातूर 52 हजार 400 52 हजार 900
सांगली 52 हजार 400 52 हजार 900
बारामती  52 हजार 400 52 हजार 900

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई 70 हजार 800  71 हजार 350 
पुणे  70 हजार 800  71 हजार 350
जळगाव  70 हजार 800  71 हजार 350
कोल्हापूर 70 हजार 800  71 हजार 350
लातूर 70 हजार 800  71 हजार 350
सांगली 70 हजार 800  71 हजार 350
बारामती  70 हजार 800  71 हजार 350

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी