Gold Rate Today 16th December: सोन्याच्या भावात घसरण सुरूच, फटाफट चेक करा ताजा भाव

Gold price today: सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गुरुवारी (16 डिसेंबर 2022) सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्यावर आता शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. 

Gold rate today in mumbai thane pune nagpur check latest rates of 16th december in marathi
Gold Rate Today 16th December: सोन्याच्या भावात घसरण सुरूच, फटाफट चेक करा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
  • सोने घरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
  • जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा भाव किती?

Today Gold rate in mumbai thane pune nagpur: सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. 9 महिन्यांचा उच्चांकी दर गाठल्यानंतर सोन्याच्या भावात वेगाने घसरण होत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर या आठवड्याभरात तीन दिवस किरकोळ व्यापारात तेजी राहिल्यावर आता सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याच्या भावात 310 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. तर सोन्याच्या भावात प्रति किलोग्रॅम 1000 रुपयांची घसरण झाली आहे. (Gold rate today in mumbai thane pune nagpur check latest rates of 16th december in marathi)

तीन फेब्रुवारी 2023 साठीच्या फ्यूचर्ससाठी सोन्याच्या वायदा भावात एमसीएक्सवर 37 रुपये म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरण झाली. यामुळे सोन्याचा भाव 54,157 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. याच दरम्यान 3 मार्च 2023 च्या फ्युचर्ससाठी चांदीच्या वायदा भावात सुद्धा घसरण पहायला मिळाली. या घसरणीसह चांदीचा भाव 67,673 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. चांदीच्या भावात 218 रुपये म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पहायला मिळालं.

हे पण वाचा : गरोदरपणात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका

सोन्याच्या भावात घसरण

गुरुवारी 3 फेब्रुवारी 2023 च्या फ्युचर्ससाठी सोन्याच्या वायदा भावात 320 रुपयांची घसरण पहायला मिळाली. बाजार उघडताच सोन्याचा भाव 54,348 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तीन मार्च 2023 रोजीच्या फ्युचर्ससाठी चांदीच्या भावात 1201 रुपये म्हणजेच 1.73 टक्क्यांनी घसरण झाली यामुळे चांदीचा भाव 68210 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला.

हे पण वाचा : हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई  54 हजार 220   54 हजार 530
पुणे   54 हजार 220  54 हजार 530
जळगाव   54 हजार 220  54 हजार 530
कोल्हापूर  54 हजार 220  54 हजार 530
लातूर  54 हजार 220  54 हजार 530
सांगली  54 हजार 220  54 हजार 530
बारामती   54 हजार 220  54 हजार 530 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई  69 हजार 500   70 हजार 500 
पुणे   69 हजार 500   70 हजार 500
जळगाव   69 हजार 500   70 हजार 500
कोल्हापूर  69 हजार 500   70 हजार 500
लातूर  69 हजार 500   70 हजार 500
सांगली  69 हजार 500   70 हजार 500
बारामती   69 हजार 500   70 हजार 500

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी