गणपती बाप्पा पावला, सोन्याच्या दरात घसरण

काम-धंदा
Updated Sep 02, 2019 | 20:23 IST

Gold Rate Today: सर्वत्र गणरायाचं आगमन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात झालं आहे. त्याच दरम्यान आता भाविकांना गणपती बाप्पा पावल्याचं दिसत आहे. कारण, आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या नवे दर...

Gold
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी
  • सोन्याच्या दरात झाली घसरण
  • जाणून घ्या आजचा सोन्याचा दर काय आहे

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात होत असलेल्या दरवाढीला आता ब्रेक लागला आहे. केवळ दरवाढीला ब्रेक लागला नाहीये तर सोन्याच्या दरात घसरणही झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे आणि काय आहेत नवे दर...

स्थानिक आभूषण व्यापाऱ्यांच्या मागणीत झालेल्या घसरणीमुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात ४० रुपयांनी घसरण झाली आहे त्यामुळे सोन्याचा दार ३९,६०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. 

अखिल भारतीय सराफा संघाच्या मते, चांदीची किंमत ४८,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर कायम आहे. बाजारातील सूत्रांच्या मते, स्थानिक आभूषण व्यापाऱ्यांची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मकता असल्याने सोन्याच्या दरात होणाऱ्या घसरणीला काहीसा अंकुश लागला. 

न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात हलकी तेजी पहायला मिळाली त्यामुळे सोन्याचा दर १५२३.७० डॉलर प्रति ओंस इतका झाला. तर दुसरीकडे चांदीच्या दरात हलकीशी घसरण होत १८.४१ डॉलर प्रति औंस इतका झाला. दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ४०-४० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे या सोन्याचा दर क्रमश: ३९,६०० रुपये आणि ३९,४३० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. याचप्रकारे आठ ग्रॅम गिन्नीच्या दरात १००० रुपयांनी घसरण होत २९,१०० रुपयांवर पोहोचला.

गेल्या अनेक दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत होती. सतत होत असलेल्या दरवाढीमुळे सोन्याचा दर नवनवा उच्चांक गाठत होता. तर या दरवाढीमुळे खरेदी करणाऱ्यांमध्ये काहीचं चिंतेच वातवरण होतं. तसेच नागरिक सोनं-चांदी खरेदी करण्यापासून दूर राहत होते. मात्र, आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...