गणेशोत्सवात आनंदवार्ता: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today: सोनं आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात दरवाढ सुरू आहे. जाणून घ्या सोनं आणि चांदीच्या दरात कपात झाल्यावर आता काय दर आहे.

Gold
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गणेशोत्सवात सर्वांसाठी आनंदाची बातमी
  • सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
  • सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात वाढ होत होती आता सोमवारी या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील चांदीच्या दरात १४०० रुपयांची घसरण झाली आहे तर सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी घसरण झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थितीत पोहोचल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३९२२५ रुपये झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल १४०० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा दर ४८५०० रुपये प्रति किलो झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनलिस्टच्या मते, सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. 

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर १४ पैशांनी कमकूवत होत ७१.५८ इतका झाला आहे. अमेरिकेत फेड व्याज दरात कपातीची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १५१० डॉलर आणि चांदीचा भाव १८.१७ डॉलरवर ट्रेंड करत होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल यांच्या मते, सोनं आणि चांदीच्या दारत बदल होत आहेत. अमेरिकेतील व्याज दर आणि चीनसोबत व्यापारा संबंधी बोलणी सुरू होण्याचे संकेत या सर्वाचा परिणाम बाजाराव दिसून येणार आहे. शनिवारी सोन्याच्या दर ३९५२५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ४९९०० रुपयांवर बंद झाला. एमसीएक्सवर सोन्याचा दर ४ रुपयांनी घसरूण ३८५४९ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला तर चांदीच्या दरात ८७ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४७७९८ रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सलग वाढ होत होती. या दरवाढीमुळे सोनं आणि चांदीचा दर नवनवा उच्चांक गाठत होतं. दररोज होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी