सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, सोनं ३९,००० रुपयांवर

काम-धंदा
Updated Aug 22, 2019 | 18:29 IST

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा दर तब्बल ३९,००० रुपयांवर पोहोचला आहे. जाणून घ्या आज सोनं आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Price Today
सोन्याच्या दरात वाढ   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ
  • सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक
  • सोन्याचा दर ३९,००० रुपयांच्या घरात
  • जाणून घ्या सोनं आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ

मुंबई: सोन्याच्या दरात असलेली तेजी आजही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात १५० रुपायांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याचा दर ३८,९७० रुपयांवर पोहोचला आहे. अखिल भारतीय सराफा संघाच्या सराफानुसार, सोन्याच्या दरात होत असलेल्या दरवाढीमागचं मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण तसेच शेअर बाजारातील परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी साराफा बाजाराकडे गुंतवणूकीसाठी सोन्याला दिलेली पसंती आहे.

सोन्याचा दर गाठतोय नवा उच्चांक

मंगळवारनंतर सोन्याच्या दरात सलग वाढ होत नवा उच्चांक गाठत असल्याचं दिसत आहे. केवळ सोन्याच्या दरात नाही तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. शिक्का निर्मात्यांकडून होणाऱ्या मागणीत वाढ झाल्यामुळे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ६० रुपयांनी वाढ झाली आहे आणि त्यामुळे चांदीचा दर ४५,१०० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

म्हणून होतेय सोन्याच्या दरात वाढ

बाजारातील सूत्रांनी सांगितले की, परदेशातील बाजारात कमकूवत परिस्थिती असतानाही स्थानिक आभूषण व्यापाऱ्यांनी सतत खरेदी केल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. यासोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण आणि शेअर बाजारातील परिस्थिती या सर्वांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर १,४९८.८० डॉलर प्रति औंस इतका होता तर चांदीच्या दरात घसरण होऊन १७.०९ डॉलर प्रति औंस इतका झाला. देशाची राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आणि त्यामुळे हा दर ३८,९७० रुपयांवर पोहोचला. तर ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १७० रुपयांनी वाढ झाली आणि १० ग्रॅम सोन्याचा दर ३८,८२० रुपयांवर पोहोचला.

चांदीच्या दरातही होतेय वाढ

चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ६० रुपयांनी वाढ होत ४५.१०० रुपये किलो इतका झाला. चांदीच्या शिक्क्यांच्या किमतीचा लिलाव ९१,००० रुपये आणि विक्री ९२,००० रुपये शेकडावर बंद झाला.

सोनं खरेदीवर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सलग वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होणाऱ्या या वाढीमुळे सोनं खरेदीवर याचा परिणाम झाल्याचं पहायला मिळत आहे. बाजारातील परिस्थिती पाहता येत्या काळातही अशीच परिस्थिती आणि सोन्याच्या दरात आणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...