Gold Rate : भारतात सोन्याच्या दरात तेजी कायम; पाहा सोन्याचा दर

काम-धंदा
Updated Jun 10, 2019 | 19:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Rate: सध्या सोन्या-चांदीचे दर, हे खनिज तेलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून आहेत. विदेशी बाजारपेठेतील उलाढालींमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये तेजी पहायला मिळाली आहे.

Gold rates rise
सोन्याच्या दरात तेजी कायम   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात तेजी-मंदी सुरूच आहे. विदेशी बाजारपेठेतील उलाढालींमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा तेजी पहायला मिळाली. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ११० रुपयांनी वाढला होता. दुसरीकडे चांदीच्या दरांमध्ये ५०० रुपयांनी (प्रति किलो) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. औद्योगिक क्षेत्रात तसेच नाणी उत्पादनात चांदीची मागणी कमी असल्याने त्याचा दरांवर परिणाम होताना दिसत आहे. सध्या सोने-चांदीचे दर, हे खनिज तेलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून आहेत. विशेषतः डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चढ-उतार यावर सोने-चांदीचे दर अवलंबून आहेत. तसेच स्थानिक बाजारातून ज्वेलर्स किंवा कारागिरांच्या मागणीचा परिणामही सोन्याच्या आणि चांदीच्या दरांवर होताना दिसतो. भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. सणासुदीचा आणि लग्न सराईचा काळ सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे भारतातील दरांकडे संपूर्ण जगाच्या बाजाराचे लक्ष असते.

जागतिक बाजारात अपेक्षित तेजी नाही

सोमवारी झालेल्या सोन्याच्या दरांमधील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी माहिती दिली. सोन्याच्या दरांमधील तेजी मागे स्थानिक ज्वेलर्स किंवा कारागिरांकडून सोन्याला असलेली मागणी हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. जागतिक पातळीवर मात्र सोन्याला खूप मोठी तेजी मिळालेली नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १ हजार ३२७ डॉलर आहे. तर, चांदीचा दर १४.८२ डॉलर प्रति औंस आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अमेरिका चीन व्यापार युद्धानंतर अमेरिका-मेक्सिको व्यापार युद्धाची चर्चा सुरू होती. पण, हा वाद आता थंडावला आहे. त्यामुळे त्याचे इतर बाजारपेठांमधील परिणाम कमी जाणवू लागले आहेत.

सोन्याचे आठ ग्रॅमचे नाणे स्थिर

सध्या दिल्लीच्या सराफी बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोने ३३ हजार ७३० रुपये तोळा दराने तर, ९९.५ टक्के शुद्ध सोने ३३ हजार ५६० रुपये तोळा या दराने विकले जात आहे. या दोन्ही सोन्याच्या दरात आज, ११० रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे आठ ग्रॅमचे नाणे २६ हजार ७०० रुपयांच्या दरानेच विकले जात आहे. शनिवारी सोन्याच्या दरात २०० रुपयांनी (प्रति तोळा) तेजी आली होती. चांदीचे दर ५०० रुपयांनी कोसळून ३७ हजार ८५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे चांदीच्या नाण्याचा लिलाव ८० हजार तर विक्री ८१ हजार रुपये शेकडा या दरावर स्थिर होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Gold Rate : भारतात सोन्याच्या दरात तेजी कायम; पाहा सोन्याचा दर Description: Gold Rate: सध्या सोन्या-चांदीचे दर, हे खनिज तेलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून आहेत. विदेशी बाजारपेठेतील उलाढालींमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये तेजी पहायला मिळाली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola