Gold Rate : ऐन लग्नसराईत सोन्या चांदीचे दर घसरू लागले

काम-धंदा
Updated Apr 15, 2019 | 22:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Sliver Rate In Market: देशात सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे आणि जागतिक बाजारातील ही उदासीनता यांमुळे सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरांत घसरण पाहायला मिळत आहे. सामान्य ग्राहकांसाठी मात्र ही आनंदाची बाब आहे.

Gold rates decline because of poor demand
सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरांत घसरण
  • सोन्याची मागणी घटल्याने दरांत घसरण
  • ऐन लग्न सराईत सोन्याच्या दरांत होऊ लागली घसरण

नवी दिल्ली : तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सोन्याचे आणि चांदीचे दर घसरू लागले आहेत. सलग चौथ्यादिवशी या दरांमध्ये घसरण दिसत आहे. देशांतर्गत बाजारात कमी झालेली सोन्याची घटलेली मागणी आणि जागतिक बाजारातील ही उदासीनता यांमुळे सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरांत घसरण पहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा दर २०० रुपयांनी घसरून ३२ हजार ६२० रुपये तोळा यावर स्थिरावला.

अखिल भारतीय सराफ संघाच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक युनिट्स आणि आणि नाणी उत्पादकांकडे उठाव कमी असल्याने चांदीचा दरही प्रति किलो ८० रुपयांनी घसरून ३८ हजार १०० रुपये प्रति किलो झाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे सराफ बाजारावर परिणाम झाला आहे. याच्यासोबत स्थानिक दागिने कारागिरांकडूनही मागणी घटल्यामुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात फारशी समाधानकारक स्थिती नसल्यामुळे सोन्याच्या दरांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली असून, सोने प्रति पाऊंड १ हजार २८७.१०डॉलरपर्यंत खाली आले आहेत. तर, चांदी प्रति पाऊंड १५.०१ वर खाली आली आहे. भारतात गेल्या आठवड्यात शनिवारी सोने प्रति तोळा ३० रुपयांनी घसरले होते. त्या आधाची घसरण घेतली तर, चार दिवसांत सोने २५० रुपयांनी घसरले आहे. दिल्ली सराफ बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५० टक्के शुद्ध सोने २०० रुपयांनी घसरले आहे. शुद्धतेतील ९९.९० टक्के शुद्ध सोने ३२ हजार ६२० आणि ९९.५० टक्के शुद्ध सोने ३२ हजार ४५० रुपयांवर आले. आठ ग्रॅमचे नाणे २६ हजार ४०० रुपयांवर घसरले आहे. चांदी प्रति किलो ३८ हजार १०० रुपयांवर घसरली आहे.

सामान्य ग्राहकांना दिलासा

सामान्य माणसांना शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची वाटते. मुला-मुलींचे लग्न यानिमित्ताने सोने खरेदी होतेच. पण, गुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी केले जाते. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने हळू हळू घसरण होताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे आणि याकाळात मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी केली जातात. लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Gold Rate : ऐन लग्नसराईत सोन्या चांदीचे दर घसरू लागले Description: Gold Sliver Rate In Market: देशात सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे आणि जागतिक बाजारातील ही उदासीनता यांमुळे सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरांत घसरण पाहायला मिळत आहे. सामान्य ग्राहकांसाठी मात्र ही आनंदाची बाब आहे.
Loading...
Loading...
Loading...