Gold-Silver Rate Today, 12 August 2022: सोन्याचा भाव स्थिर, अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या शक्यतेचा दबाव, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 12 August 2022 : सोन्याचा भाव (Gold Price) आज स्थिर आहे. अमेरिकन बॉंडच्या परताव्यातील वाढ आणि अमेरिकेतील व्याजदरात वाढ (US interest rate hikes) होण्याची शक्यता या कारणांमुळे आज शुक्रवारी सोन्याचा भाव स्थिर होता. डॉलरच्या कमकुवतपणापणे सोने चौथ्या आठवड्यातील नफा नोंदवण्याच्या ट्रेंड असले तरी अमेरिकेतील घटकांच्या दबावामुळे सोन्यातील तेजी रोखली गेली असून सध्या भाव स्थिर आहेत.

Gold and Silver Rate Today:  Gold prices remains flat
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव स्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याचा भाव स्थिरावला
  • अमेरिकन बॉंडच्या परताव्यातील वाढ आणि अमेरिकेतील व्याजदरात वाढ (US interest rate hikes) होण्याची शक्यता
  • अमेरिकेतील घटकांच्या दबावामुळे सोन्यातील तेजी रोखली गेली

Gold and Silver Rate Today, 12 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याचा भाव (Gold Price) आज स्थिर आहे. अमेरिकन बॉंडच्या परताव्यातील वाढ आणि अमेरिकेतील व्याजदरात वाढ (US interest rate hikes) होण्याची शक्यता या कारणांमुळे आज शुक्रवारी सोन्याचा भाव स्थिर होता. डॉलरच्या कमकुवतपणापणे सोने चौथ्या आठवड्यातील नफा नोंदवण्याच्या ट्रेंड असले तरी अमेरिकेतील घटकांच्या दबावामुळे सोन्यातील तेजी रोखली गेली असून सध्या भाव स्थिर आहेत. गुरुवारी आलेली आकडेवारी दर्शविते की अमेरिकन उत्पादकांच्या किंमती जुलैमध्ये अनपेक्षितपणे घसरल्या. गॅसोलीनच्या किंमतीत घट झाल्यामुळे जुलैमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) स्थिर झाल्याच्या बातम्या  आल्यानंतर एक दिवसाने हे झाले. (Gold remains stable amid prospects of US interest rate hikes)

अधिक वाचा : Office Tips: जेव्हा ऑफिसमध्ये आळस येतो तेव्हा लगेच करा ही गोष्ट, झोप होईल गायब

सोन्याचा ताजा भाव

मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी वाढून 51 रुपयांनी 52,387 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. मात्र, चांदीचा भाव 0.26 टक्क्यांनी किंवा 152 रुपयांनी वाढून 58,529 रुपये प्रति किलोवर पोचला आहे.

तज्ज्ञांचे मत

ICICIDirect ने सांगितले की, महागाई शिगेला जाण्याची चिन्हे दर्शविणारी आकडेवारी दर्शवत असतानाही अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांनी केलेल्या बेताल धोरणामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली.  "अमेरिकन डॉलर निर्देशांकातील सततच्या घसरणीने सोन्याच्या भावातील आणखी घसरण रोखली." अमेरिकेमधील सुधारित अर्थव्यवस्थेशी निगडीत आकडेवारी मौल्यवान धातूंच्या भावावर दबाव आणते आहे, असेही त्यात म्हटले आहे. "बेरोजगार फायद्यांसाठी नवीन दावे दाखल करणाऱ्या अमेरिकनांची संख्या ताज्या अपडेटमध्ये 248,000 वरून 262,000 पर्यंत वाढली आहे." वाढत्या अमेरिकन व्याजदरांचा सोन्याच्या भावावर थेट मोठा परिणाम होतो आहे. कारण यामुळे नॉन-इल्डिंग सोने बाळगण्याचा संधी खर्च वाढतो. डॉलरचे मूल्य घसरल्यावर अशा परिस्थितीत इतर चलनात सोने विकत घेणाऱ्यांसाठी कमी महाग होते.

अधिक वाचा : छोटू भैय्याला केवळ बॅट-बॉल खेळला पाहिजे..उर्वशीला पंतला टोला

सराफा बाजार

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 52,460 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले. तर चांदीचा भाव 58,700 रुपये प्रति किलो होता.

सोन्याच्या स्पॉट किंमती गेल्या तीन आठवड्यात सुमारे 2,500 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढल्या आहेत. तर याच कालावधीत चांदी 4,800 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त वाढली आहे. अलीकडच्या भावात वाढ होऊनही ETF मधील गुंतवणूक देखील गुंतवणुकदारांच्या निरुत्साहच दर्शविते ," अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अधिकारी दरवाढीसाठी आग्रही असल्याने त्याचा सोन्याच्या भावावर दबाव राहणार आहे.

अधिक वाचा : Daughter cheated Mother : मुलीनेच दिला आईला धोका, ज्योतिषी आणि सायकॉलॉजिस्टच्या मदतीने लुटले 100 मिलियन डॉलर

जागतिक बाजारपेठेतील भाव

स्पॉट गोल्ड प्रति औंस 1,789.81 डॉलरवर टिकून आहे.  या आठवड्यात सोने आतापर्यंत जवळपास 1 टक्क्यांनी वाढले आहे. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून 1,804.20 डॉलरवर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी घसरून 20.34 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.1 टक्क्यांनी घसरून 955.16 डॉलर आले. तर पॅलेडियम 0.6 टक्क्यांनी घसरून 2,262.53 डॉलरवर आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी