Gold-Silver Rate Today, 02 September 2022: सोन्याच्या भावात अस्थिरता कायम, चांदीमध्येही महिनाभरात मोठी घसरण

Gold and Silver Rate Today, 02 September 2022 : सोन्याच्या भावात शुक्रवारी थोडी सुधारणा झाली मात्र अद्यापही सोन्याचे भाव घसरलेल्या पातळीवरच आहेत. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्स (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.08 टक्क्यांनी किंवा 39 रुपयांनी वाढून 50,109 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. प्रमुख मध्यवर्ती बँकांनी गगनाला भिडलेल्या महागाईला नियंत्रण घालण्यासाठी आक्रमक चलनविषयक धोरण कठोरपणे सुरू ठेवण्याची अपेक्षा केली आहे.

Gold and Silver Rate Today:  Gold prices remains flat
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव अस्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावातील अस्थिरता कायम
  • चांदीचा भाव घसरला
  • जगभरातील मध्यवर्ती बॅंका व्याजदर वाढवण्याच्या भूमिकेत

Gold and Silver Rate Today, 02 September 2022: नवी दिल्ली: सोन्याच्या भावात शुक्रवारी थोडी सुधारणा झाली मात्र अद्यापही सोन्याचे भाव घसरलेल्या पातळीवरच आहेत. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्स (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.08 टक्क्यांनी किंवा 39 रुपयांनी वाढून 50,109 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. मात्र चांदीचा वायदा 0.21 टक्क्यांनी वाढून 113 रुपये प्रति किलो 52,715 रुपये झाला. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 50,409 रुपयांच्या पातळीवर तर चांदीचा भाव 52,022 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. (Gold remains unstable, Silver also drops amid global clues)

अधिक वाचा : INS Vikrant : पहिली भारतीय बनावटीची विमानवाहक नौका INS विक्रांत नौदलाच्या सेवेत

जाणकारांचे मत

अॅक्सिस सिक्युरिटीजच्या कमोडिटीजचे प्रमुख पटनाईक यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे हे आश्चर्यकारक नाही. यूएस फेडच्या भूमिकेनंतर सोन्यासंदर्भातील कल दिसून येतो आहे. "बाजार आज निश्चितपणे NFP डेटाचा मागोवा घेईल, परंतु कोणत्याही प्रकारे, ते सोन्यासाठी चांगले ठरतील असे दिसत नाही," ते पुढे म्हणाले "सोन्यातील रिकव्हरी रॅलीला अजून काही वेळ बाकी आहे."

प्रमुख मध्यवर्ती बँकांनी गगनाला भिडलेल्या महागाईला  नियंत्रण घालण्यासाठी आक्रमक चलनविषयक धोरण कठोरपणे सुरू ठेवण्याची अपेक्षा केली आहे. परंतु आर्थिक मंदीची भीतीही मध्यवर्ती बँकांना वाटू लागली आहे.जरी सोन्याला महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळातील सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून पाहिले जात असले तरी, वाढलेले व्याजदर सोने बाळगण्याचा संधी खर्च वाढवतात. चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सततच्या कोविड निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात कमकुवतपणा आला आहे त्यामुळे आधीच धोक्यात आलेल्या सोन्याच्या ग्राहकांसाठी जोखीम पुन्हा निर्माण झाली आहे.

अधिक वाचा : Gujarat Accident : गुजरातमध्ये अंबाजीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना गाडीने चिरडले, ६ भाविकांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

आंतरराष्ट्रीय घटक

गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या स्पॉट किंमती 2,050 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त घसरल्या आहेत. तर याच कालावधीत चांदीच्या किंमती 6,700 रुपये प्रति किलो घसरल्या आहेत.सर्वात मोठी मध्यवर्ती बॅंक असलेल्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी अलीकडच्या आपल्या भाषणात दिलेला संदेश मोठा आणि स्पष्ट आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईचा दबाव अजून कायम राहणार आहे कायम राहण्यासाठी येथे आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विलक्षण प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी बहुधा रोजगार कमी होणे आणि अर्थव्यवस्थांमधील मंदीला तोंड द्यावे लागेल असे जेरोम पॉवेल यांनी म्हटले होते. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आगामी काळात दरवाढ करण्याचीच चिन्हे आहेत.

अधिक वाचा : समुद्रात तरंगणारे आधुनिक शहर आहेत विमानवाहक नौका, जाणून घ्या कोणत्या देशाकडे किती विमानवाहक नौका

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड 0.1 टक्‍क्‍यांनी वाढून 1,697.80 डॉलर प्रति औंस झाले, परंतु आतापर्यंत आठवड्यात 2.2 टक्‍क्‍यांनी घसरले. अमेरिकन सोन्याचे वायदे 1,709.10 डॉलरवर स्थिर होते. स्पॉट सिल्व्हर 0.1 टक्क्यांनी घसरून 17.83 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी वाढून 829.87 डॉलर आणि पॅलेडियम 0.3 टक्क्यांनी वाढून 2,018.63 डॉलरवर पोचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी