Gold Price Update | सोने स्वस्त झाले हो...गुंतवणुकदारांची चांदी, पाहा ताजा भाव

Gold rate | या आठवड्याच्या सुरूवातीलाच सोने स्वस्त झाले आहे. सोने ९३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह ४८,१७१ रुपयांच्या (Gold price) पातळीवर आले आहे. याआधी शुक्रवारी सोने ४८,२६४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या किंमतीवर बंद झाले होते. सोन्याबरोबरच चांदीच्या भावातदेखील घसरण झाली आहे. चांदी ४६७ रुपये प्रति किलोने घसरून ६१.४१६ रुपये प्रति किलोच्या (Silver rate) पातळीवर बंद झाली.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोन्याची खरेदीची मोठी संधी
  • सोने उच्चांकीपेक्षा ८०२९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त
  • २४ कॅरेट सोन्याचा ताजा भाव ४८,१७१ रुपये प्रति १० ग्रॅम

Gold Price Today | नवी दिल्ली : जर तुम्ही सोने (Gold) विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. या आठवड्याच्या सुरूवातीलाच सोने स्वस्त झाले आहे. सोने ९३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह ४८,१७१ रुपयांच्या (Gold price) पातळीवर आले आहे. याआधी शुक्रवारी सोने ४८,२६४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या किंमतीवर बंद झाले होते. सोन्याबरोबरच चांदीच्या भावातदेखील घसरण झाली आहे. चांदी ४६७ रुपये प्रति किलोने घसरून ६१.४१६ रुपये प्रति किलोच्या (Silver rate) पातळीवर बंद झाली. शुक्रवारी चांदीचा भाव ६१,८८३ रुपये प्रति किलो इतका होता. (Gold & Silver gets cheaper, check the gold rate)

१४ ते २४ कॅरेट सोन्याचा ताजा भाव

२४ कॅरेट सोन्याचा ताजा भाव ४८,१७१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९७८ रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,१२५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३६,१२८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. १४ कॅरेट सोने २८,१८० रुपये प्रति १० ग्रॅम या भावावर ट्रेड करत होते.

ऑलटाइम उच्चांकीपेक्षा ८०२९ रुपये स्वस्त झाले सोने

सोने आपल्या आतापर्यतच्या उच्चांकी भावापेक्षा ८०२९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव आतापर्यतच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. त्यावेळेस सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोचला होता. तर चांदीचा भाव आपल्या उच्चांकी पातळीपेक्षा १८,५६४ रुपये प्रति किलोने स्वस्त झाला आहे. चांदी ७९,९८० रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोचली होती.

सोने विकत घेताना हॉलमार्क पाहूनच सोने विकत घ्यावे. हॉलमार्क ही एक प्रकारे सोन्याच्या शुद्धतेसंदर्भात सरकारची गॅरंटी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड हॉलमार्कची निश्चिती करते. 

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS)नुसार रिटेलर किंवा सराफाकडून दागिने विकत घेतल्यास त्याच्याकडून योग्य बिल किंवा इन्व्हॉइस ग्राहकांनी नक्की घेतले पाहिजे. कोणत्याही प्रकारची तक्रार दूर करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. त्यामुळे हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचे बिल कसे असले पाहिजे आणि त्यात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख असला पाहिजे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

बीआयएसच्या सूचना

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS)च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सराफाकडून मिळालेल्या बिल किंवा चलानमध्ये हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंची माहिती व्यवस्थित दिलेली असली पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांच्या बिलात प्रत्येक वस्तूचे विवरण, किंमतीची माहिती, शुद्धता, धातूचे शुद्ध वजन, कॅरेट आणि हॉलमार्किंग चार्ज यांचा उल्लेख असला पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंच्या बिलात असेही लिहिलेले असले पाहिजे की ग्राहक हॉलमार्क असणाऱ्या दागिने किंवा वस्तूंच्या शुद्धतेला बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही केंद्रात तपासू शकतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी