Gold Price Update | लागोपाठ तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी

Gold Price | या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी सोने (Gold) स्वस्त झाले आहे. बुधवारी सोने २०६ रुपये (Gold rate)प्रति १० ग्रॅमने स्वस्त होत ४८,१०५ रुपयांच्या पातळीवर आले होते. त्याआधी मंगळवारी सोने ४८,३११ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होते. सोन्याबरोबर बुधवारी चांदीच्या भावातदेखील (Silver rate) मोठी घसरण झाली. बुधवारी चांदीचा भाव १३९ रुपये प्रति किलोने स्वस्त होत ६१,५२० रुपये प्रति किलोच्या पातळीवर आला होता.

Gold Price Today
सोन्याच्या भावत घसरण, गुंतवणुकीची संधी 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात मोठी घसरण
  • आठवडाभरात तिसऱ्यांदा सोन्याचा भाव घसरला
  • चांदीदेखील झाली स्वस्त

Gold Price Update | नवी दिल्ली : जर तुम्हाला सोने खरेदी (Gold Investment)करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी सोने (Gold) स्वस्त झाले आहे. बुधवारी सोने २०६ रुपये (Gold rate)प्रति १० ग्रॅमने स्वस्त होत ४८,१०५ रुपयांच्या पातळीवर आले होते. त्याआधी मंगळवारी सोने ४८,३११ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होते. सोन्याबरोबर बुधवारी चांदीच्या भावातदेखील (Silver rate) मोठी घसरण झाली. बुधवारी चांदीचा भाव १३९ रुपये प्रति किलोने स्वस्त होत ६१,५२० रुपये प्रति किलोच्या पातळीवर आला होता. तर मंगळवारी चांदीचा भाव ६१,६५९ प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. (Gold Silver price gets down for third time in a week)

१४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव

बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव सध्या ४८,१०५ रुपये प्रति १० ग्रॅम, २३ कॅरेटवाल्या सोन्याचा भाव ४७,९१२ रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेटवाल्या सोन्याचा भाव ४४,०६४ रुपये प्रति १० ग्रॅम, १८ कॅरेटवाल्या सोन्याचा भाव ३६,०७९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १४ कॅरेट सोन्याच्या भाव जवळपास २८,१४१ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आहे. 

उच्चांकीपेक्षा ८,०९५ रुपये आणि १८,४६० रुपये स्वस्त झाले सोने

मंगळवारी सोने आपल्या आतापर्यतच्या उच्चांकी भावापेक्षा ८,०९५ रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले होते. ऑगस्ट २०२० मध्ये सोने आतापर्यतच्या उच्चांकी पातळीवर पोचले होते. त्यावेळेस सोने ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम सोन्याच्या पातळीवर पोचले होते. तर चांदी आपल्या आतापर्यतच्या उच्चांकी भावापेक्षा १८,४६० रुपये प्रति किलो स्वस्त मिळते आहे. चांदीने आतापर्यतची उच्चांकी पातळी गाठताना ७९,९८० रुपये प्रति किलोचा भाव गाठला होता.

मिस कॉल देऊन मिळवा सोन्याचा ताजा भाव

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठीचा किरकोळ बाजारातील भाव जाणून घेण्यासाठी ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सोन्याचा ताजा भाव तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यानंतर काही वेळातच एसएमएसद्वारे तुम्हाला रेट्स मिळतील. शिवाय याचबरोबर ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवर जाऊन देखील माहिती घेऊ शकता.

असे जाणून घ्या सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर सरकारने यासाठी एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासता येते असे नाही तर तुम्ही यासंदर्भातील तक्रार देखील करू शकता.

हॉलमार्क पाहून खरेदी करा सोने

सोने किंवा सोन्याचे दागिने घेताना त्याची शुद्धता नक्की तपासून घ्या. हॉलमार्क पाहूनच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली पाहिजे. हॉलमार्क ही सोन्याच्या शुद्धतेची सरकारकडून दिलेली गॅरंटी आहे. भारतातील शुद्धतेसाठीची एकमेव एजन्सी असलेल्या ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS)हॉलमार्किंग काम करते. हॉलमार्किंगची योजना भारतीय मानक ब्युरो अधिनियमाच्या रेग्युलेशनचे काम करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी