Gold Rate Today 15 December: सोने खरेदीची संधी; स्वस्त झालं सोने-चांदी, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Gold silver price today: सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जाणून घ्या सोने आणि चांदीचे नवे दर काय आहेत.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
  • सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी
  • चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold and Silver rate 15th December 2022: अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पुढील वर्षासाठी व्याज दरात वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर आता गुरुवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या वायदा भावात 0.58 टक्के म्हणजेच 318 रुपयांनी घसरण झाली. या घसरणीमुळे सोन्याचा भाव 54,356 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर चांदीचा वायदा भाव 1.67 टक्के म्हणजेच 1155 रुपयांच्या घसरणीसह 68,147 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. (gold silver price today 15 december 2022 check latest rates)

गेल्या सत्रात इतका होता शुद्ध सोन्याचा भाव

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (Indian Bullion and Jewellers Association) च्या मते, स्पॉट मार्केटमध्ये बुधवारी सर्वाधिक शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 54,386 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा भाव 67,642 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

गेल्या दोन आठवड्यांत सोन्याचा स्पॉट मार्केटमधील भावात 1600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली. यासोबतच चांदीच्या भावात 5700 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी वाढ झाली होती.

हे पण वाचा : गरोदरपणात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका

आंतरराष्ट्रीय बाजारात किती आहे भाव?

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट मार्केटमध्ये 0.1 टक्क्यांनी घसरण होत 1806.11 डॉलर प्रति औंस इतका होता. तर अमेरिकन सोन्याच्या वायदा भावात थोडा बदल होऊन 1817.80 डॉलर इतका झाला होता. स्पॉट सिल्वर 0.4 टक्क्यांवरुन 23.81 डॉलर इतकी घसरण झाली. प्लॅटिनम 0.1 टक्के इतका झाला आणि 1027.82 डॉलर इतका भाव झाला. पॅलेडियम 0.1 टक्क्यांवरुन घसरण होत 1914.98 डॉलर इतका भाव झाला.

हे पण वाचा : लैंगिक संबंध ठेवताना महिला खोटं का बोलतात? वाचा

डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण

अमेरिकन डॉलर आणखी मजबूत झाला आणि डोमेस्टिक शेअर बाजारात घसरणीमुळे गुरुवारी भारतीय रुपयात 15 पैशांची घसरण झाली. या घसरणीमुळे भारतीय रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 82.74 रुपये इतकी झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी