Gold Price Today4 April 2022 : नवी दिल्ली : आज सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसते आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 116 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव (Gold Price) 51228.00 रुपयांवर आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव (Silver Price) 173 रुपयांनी घसरला आहे. चांदी सध्या 66569.00 वर व्यवहार करते आहे. युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर जबरदस्त तेजीत आलेला सोने आणि चांदीचा भाव आता ओहोटीच्या मार्गावर दिसतो आहे. (Gold & Silver prices dropped today, check the latest gold & silver rates)
सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 52650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज सकाळी 10 वाजता 22 कॅरेट सोन्याचा भाव 48263 रुपये होता. त्याच वेळी, 18 कॅरेटचा भाव 39488 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 30713 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 68430 रुपये होता.
अधिक वाचा : Investment Tips | तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करूनदेखील जास्त परतावा देखील मिळवू शकता! जाणून घ्या या खास टिप्स
22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत तफावत असते. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याची शुद्धता. वास्तविक, 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते. तर 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. त्यात 9 टक्के इतर धातू असतात. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसली तरी त्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने हे 24 कॅरेट सोन्याचे नसतात.
सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर सरकारने यासाठी अॅप बनवले आहे. त्याचे नाव 'BIS केअर अॅप' अॅप आहे. त्याच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपच्या मदतीने तुम्ही केवळ अचूकता तपासू शकत नाही तर त्यासंबंधीच्या तक्रारीही करू शकता.
या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत त्वरित तक्रार करता येईल. याद्वारे ग्राहकाला तत्काळ तक्रार नोंदवण्याची माहितीही मिळणार आहे.
सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांच्या किमती तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. यानंतर तुमच्या फोनवर नवीनतम दराचा एसएमएस येईल.