Gold Price Today | लग्नसराईत मोठी संधी...सोन्याची झळाळी आणि चांदीची चमक घटली...पाहा ताजा भाव

Gold Investment : जागतिक बाजारातील भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एमसीएक्स (MCX) वर, तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचा भाव (Gold Price) 52,050 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत घसरला आहे. तर चांदी (Silver Price)प्रति किलो 66,960 रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पूर्व युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्यांबद्दलच्या ताज्या चिंतेमुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे
  • तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचा भाव (Gold Price) 52,050 रुपये प्रति 10 ग्रॅम वर
  • रशिया-युक्रेन संघर्ष, जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता आणि जागतिक महागाई वाढण्याची भीती यामुळे सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराला मागणी

Gold Price Today 11 April 2022 update : नवी दिल्ली : जागतिक बाजारातील भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.  एमसीएक्स (MCX) वर, तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचा भाव (Gold Price) 52,050 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत घसरला आहे. तर चांदी (Silver Price)प्रति किलो 66,960 रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पूर्व युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्यांबद्दलच्या ताज्या चिंतेमुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे. स्पॉट गोल्ड 0.2% कमी होऊन 1,942.93 डॉलर प्रति औंस झाला. (Gold & Silver prices fall, good opportunity as weeding season is ahead, check latest rate)

अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल

सोन्याच्या भावातील चढउतार

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर मजबूत अमेरिकन डॉलर आणि बाँडच्या वाढलेल्या उत्पन्नामुळे सोन्यावर दबाव येतो. कोरोनाची वाढती प्रकरणे आणि निराशाजनक आर्थिक कामगिरी, रशिया-युक्रेनची लढाई, चलनवाढीची चिंता आणि त्याचबरोबर चीनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती यांची चिंता या घटकांचा प्रभाव सोन्याच्या भावावर पडतो आहे. नव्या परिस्थितीमुळे ईटीएफमधील गुंतवणुकदार थोडे बाजूला सरकले आहेत. सोने एका मर्यादेत अडकले आहे आणि जोपर्यंत नवीन घडोमोडी होत नाहीत तोपर्यत सोने एका ठराविक पट्ट्यातच राहण्याची शक्यता आहे. अर्थात भू-राजकीय जोखीम कायम राहिल्यास, सोन्याच्या भावात वाढ होऊ शकते, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा : Tata Name | पहिल्यांदा जेव्हा कोणत्याही कंपनीसाठी‘टाटा’नाव वापरण्यात आले...त्याची रंजक कहाणी

शुक्रवारी सुमारे दोन वर्षांत प्रथमच 100 वर गेल्यानंतर अमेरिकन डॉलर निर्देशांक 99.880 वर स्थिर होता. मजबूत डॉलरमुळे इतर चलन धारकांसाठी सोने कमी आकर्षक ठरते. शुक्रवारी देखील, 10-वर्षाच्या अमेरिकन बॉंड उत्पन्नाने 2.73% पर्यंत मजल मारली. हा परतावा तीन वर्षांतील सर्वोच्च आहे.

आंतरराष्ट्रीय घटकांचा सोन्यावरील परिणाम

फेडरल रिझर्व्ह 2022 पर्यंत आपले चलनविषयक धोरण आक्रमकपणे पुढे नेऊ पाहते आहे. अमेरिकन बॉंडच्या उत्पन्नात वाढत होण्याच्या स्थितीत सोन्याच्या बाजारातील भावना सकारात्मक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,900 डॉलर आणि 1,950  डॉलर दरम्यान स्थिरावले आहे. तर चांदी 24 डॉलर आणि 25.65 डॉलरच्या दरम्यान स्थिर झाली आहे.सोने आणि चांदीचे भाव वरच्या बाजूला सरकण्याचा प्रयत्न करत राहतील. रशिया-युक्रेन संघर्ष, जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता आणि जागतिक महागाई वाढण्याची भीती यामुळे सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराला मागणी दिसते आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अधिक वाचा : 7th Pay Commission update | सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! फिटमेंट फॅक्टरसंदर्भात आली मोठी बातमी...

सोने आणि चांदीच्या भावांच्या पातळी

“सोन्याला 1928-1912 डॉलरवर स्थैर्य आहे, तर 1951-1962 डॉलरच्या पातळीवर अस्थिरता आहे. चांदीला 24.55- 24.40 डॉलरवर समर्थन आहे, तर 25.05-25.30 डॉलरवर प्रतिरोध आहे. रुपयाच्या बाबतीत सोन्याला 51,780-51,550 रुपयांच्या भावासाठी अनूकूल परिस्थिती आहे. तर 52,340-52,510 रुपयांची पातळी सोन्यासाठी अस्थिर आहे. चांदीला 66540-66,220 रुपयांवर समर्थन आहे तर 67,690-68050 रुपयांवर प्रतिरोध आहे, असे जाणकार सांगत आहेत.

ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर आज मॉस्को येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याने सोन्याचे व्यापारी युक्रेन संकटातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रशियन सैन्य या आठवड्यात युक्रेनच्या पूर्व भागात त्यांच्या आक्रमणाचा विस्तार करेल असे युक्रेनला वाटते आहे. इतर मौल्यवान धातूंमध्ये, स्पॉट सिल्व्हर प्रति औंस 24.75 डॉलरवर स्थिर होते आणि प्लॅटिनम 0.7% वाढून 981.41 डॉलरच्या पातळीवर होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी