Gold Price Today | लग्नसराई सुरू...सोन्यात आली तेजी, 2363 रुपयांनी वाढली चांदी, करा लगीनघाई

Gold Jewellery : भारतात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतातील सोन्याच्या भावात तेजी आली असून त्यावर मिळणाऱ्या सूटमध्ये घट झाली आहे. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की भारतातील सोन्याच्या किंमतीमध्ये 10.75% आयात शुल्क आणि 3% जीएसटी देखील समाविष्ट आहे. लग्नसराईमुळे दागिन्यांच्या मागणीत जबरदस्त वाढ होते. त्यामुळे सोने-चांदी पुन्हा एकदा तेजी दाखवत आहेत.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे
  • लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये मोठी तेजी
  • सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ९०१ रुपयांनी तर चांदीचा भाव २३६३ रुपयांनी वधारला

Gold Price Today 18 April 2022 update : नवी दिल्ली : भारतात लग्नाचा हंगाम (Wedding season) सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतातील सोन्याच्या भावात तेजी आली असून त्यावर मिळणाऱ्या सूटमध्ये घट झाली आहे.तुम्हाला हे माहित असले पाहिजे की भारतातील सोन्याच्या किंमतीमध्ये 10.75% आयात शुल्क आणि 3% जीएसटी देखील समाविष्ट आहे. सोन्याचा भाव (Gold Price) 54,060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोचला आहे. तर चांदीचा भाव(Silver Price) 69,100 रुपये प्रति किलोवर पोचला आहे. लग्नसराईमुळे दागिन्यांच्या मागणीत जबरदस्त वाढ होते. त्यामुळे सोने-चांदी पुन्हा एकदा तेजी दाखवत आहेत.  वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत सराफांनी सोन्याच्या घटणाऱ्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर 12 डॉलर प्रति औंसची सूट दिली होती. मागील आठवड्याशी तुलना करता ती 40 डॉलर पेक्षा कमी आहे. (Gold & silver prices rises amid of wedding season, check latest rates)

अधिक वाचा : Gold Mutual Funds | सोन्यात गुंतवणूक करण्याचा दमदार पर्याय...'गोल्ड म्युच्युअल फंड', पाहा जबरदस्त परतावा देणारे फंड

सोन्याच्या भावात तेजी

गेल्या आठवड्यात परदेशी बाजाराच्या तेजीचा परिणाम देशातील सर्वात मोठ्या वायदा बाजार एमसीएक्सवरही दिसून आला. आठवड्याच्या शेवटी सोन्याचा भाव ९०१ रुपयांनी वाढून ५३०७१ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोचला. त्याच वेळी, सोन्याच्या मिनीचा भाव 46 रुपयांनी कमी होऊन 52885 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तसेच स्थानिक पातळीवर चांदीचा भाव 2363 रुपयांनी वाढून 69391 रुपयांवर पोहोचला. तसेच चांदी मिनी, वीकेंडला 2281 रुपयांनी महागून 69458 रुपये किलो झाली. सध्या सोने-चांदीची खरेदी वाढते आहे आणि भावदेखील वाढतायेत.

अधिक वाचा : Income Tax Rule | भाड्याच्या घरात राहता, शिवाय HRA देखील मिळत नाही? तरीही प्राप्तिकरात मिळेल सूट...पाहा कसे

गेला आठवडा कसा गेला?

जागतिक बाजारातील मजबूत तेजीमुळे गेल्या आठवड्यात देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ९०१ रुपयांनी तर चांदीचा भाव २३६३ रुपयांनी वधारला. अहवालाच्या आठवड्यात जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली. स्पॉट गोल्ड आठवड्याच्या शेवटी 37.7 डॉलर प्रति औंस वर चढून 1977.36 डॉलर प्रति औंसवर पोचले. त्याच बरोबर, यूएस सोन्याचे फ्युचर्स देखील प्रति औंस 41.9 डॉलरने वाढून 1977 डॉलर प्रति औंस झाले. त्याचप्रमाणे, आठवड्याच्या शेवटी चांदीचा स्पॉट 1.12 डॉलर प्रति औंसने वाढून 25.69 डॉलर प्रति औंस झाला.

अधिक वाचा : Delayed Housing Project | फ्लॅटचा ताबा मिळण्यास विलंब होतोय? तुम्ही बुकिंग केलेला गृहनिर्माण प्रकल्प रखडला आहे? मग चिंता नको...पाहा यावरचे उपाय

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या सिझनमध्ये दागिने आणि सोन्याचा भाव या गोष्टी प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात. तुमच्याकडेदेखील लग्नकार्य असेल तर सोन्याच्या भावावर लक्ष ठेवत खरेदी करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी