Gold Price Today | सोने आले फॉर्मात...सोन्याच्या भावात जबरदस्त तेजी, चांदीदेखील 1,000 रुपयांनी महागली, पाहा ताजा भाव

Gold Jewellery : लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात तेजी आली आहे. आज मंगळवारी सोन्याच्या भावात वाढ होत असतानाच चांदीच्या भावातदेखील मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने ४०९ रुपयांनी महागले आहे. MCX वर, आज सकाळी बाजार उघडला तेव्हा सोने 52588 रुपयांवर व्यवहार करते आहे. तर चांदी 1011 रुपयांच्या वाढीसह 68305 रुपयांवर व्यवहार करते आहे.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात तेजी
  • आज सोने 52588 रुपयांवर व्यवहार करते आहे
  • चांदी 1011 रुपयांच्या वाढीसह 68305 रुपयांवर व्यवहार करते आहे

Gold Price Today 11 April 2022 update : नवी दिल्ली :  लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात तेजी आली आहे. आज मंगळवारी सोन्याच्या भावात वाढ होत असतानाच चांदीच्या भावातदेखील मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने ४०९ रुपयांनी महागले आहे. MCX वर, आज सकाळी बाजार उघडला तेव्हा सोने 52588 रुपयांवर व्यवहार करते आहे. तर चांदी 1011 रुपयांच्या वाढीसह 68305 रुपयांवर व्यवहार करते आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत आहे. (Gold & Silver prices show boom today, check the latest rates)

अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल

सराफा बाजारात काय चालले आहे?

सराफा बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 48868 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 53310 रुपयांवर आहे. येथे 20 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 44425 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 39983 रुपये आहे. त्याचवेळी 16 कॅरेट सोन्याचा दर 35540 रुपयांवर पोहोचला आहे.

अधिक वाचा : Linking PF account with PAN | तुमचे पीएफ खाते पॅनशी लिंक आहे का? नसेल तर लागेल दुप्पट कर...पाहा नवीन नियम आणि लिंक करण्याची पद्धत

सोन्याच्या आयातीत वाढ

वाढत्या महागाईच्या काळात देशात सोन्याकडे लोकांची क्रेझ वाढत आहे. 2021-22 च्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशातील सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलर झाली आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत सोन्याच्या आयातीचा आकडा 26.11 अब्ज डॉलर होता.

अधिक वाचा : Adani Stocks | अदानीच्या या 3 कंपन्यांच्या शेअर्सची धूम...शेअरवर पडल्या गुंतवणुकदारांच्या उड्या, काय आहे कारण?

असा तपासा सोन्याचा भाव 

सोन्याच्या दागिन्यांची किंमत देशभर बदलते, कारण त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्ज यांचाही वाटा असतो. तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तपासण्यासाठी तुम्ही इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या मोबाईल नंबरवर सोन्याच्या ताज्या भावाचा संदेश येईल.

शुक्रवारी सुमारे दोन वर्षांत प्रथमच 100 वर गेल्यानंतर अमेरिकन डॉलर निर्देशांक 99.880 वर स्थिर होता. मजबूत डॉलरमुळे इतर चलन धारकांसाठी सोने कमी आकर्षक ठरते. रशिया-युक्रेनची लढाई सुरू राहिल्यास आणि भू-राजकीय जोखीम कायम राहिल्यास, सोन्याच्या भावात वाढ होऊ शकते, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

आंतरराष्ट्रीय घटक आणि सोन्याचा भाव

फेडरल रिझर्व्ह 2022 पर्यंत आपले चलनविषयक धोरण आक्रमकपणे पुढे नेऊ पाहते आहे. अमेरिकन बॉंडच्या उत्पन्नात वाढत होण्याच्या स्थितीत सोन्याच्या बाजारातील भावना सकारात्मक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,900 डॉलर आणि 1,950  डॉलर दरम्यान स्थिरावले आहे. तर चांदी 24 डॉलर आणि 25.65 डॉलरच्या दरम्यान स्थिर झाली आहे.सोने आणि चांदीचे भाव वरच्या बाजूला सरकण्याचा प्रयत्न करत राहतील. रशिया-युक्रेन संघर्ष, जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता आणि जागतिक महागाई वाढण्याची भीती यामुळे सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराला मागणी दिसते आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी